Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma Record: ‘हिटमॅन’चा जगात डंका! ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत केला असा ‘भीमपराक्रम’, जो आजवर कुणालाच जमला नाही

Rohit Sharma News: प्रत्युतरात रोहित शर्माने (Rohit Sharma) धमाकेदार सुरुवात केली, परंतु नंतर तो आपला डाव लांबवू शकला नाही आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला. तरीही, त्याने क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 11, 2026 | 07:57 PM
'हिटमॅन'चा जगात डंका! ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत केला असा 'भीमपराक्रम', जो आजवर कुणालाच जमला नाही (Photo Credit- X)

'हिटमॅन'चा जगात डंका! ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत केला असा 'भीमपराक्रम', जो आजवर कुणालाच जमला नाही (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ‘हिटमॅन’चा जागतिक विक्रम!
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज
  • ख्रिस गेलचाही रेकॉर्ड मोडला
Rohit Sharma Sixes in International Cricket: भारत आणि न्यूझीलंडमधील (IND vs NZ) याच्यांतील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने भारतासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत आठ गडी गमावून ३०० धावा केल्या. पाहुण्या संघाकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७१ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८४ धावा केल्या. प्रत्युतरात रोहित शर्माने (Rohit Sharma) धमाकेदार सुरुवात केली, परंतु नंतर तो आपला डाव लांबवू शकला नाही आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला. तरीही, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

रोहित शर्माने केला ‘भीमपराक्रम’

भारतीय संघाकडून रोहित शर्माने पहिल्या एकदिवसीय सामन्यात २६ धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने दोन षटकार आणि तीन चौकार मारले. काइल जेमिसनच्या चेंडूवर मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करताना तो किवी कर्णधार मायकेल ब्रेसवेलने झेलबाद केला. सामन्यात दोन षटकार मारून रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकार मारले आणि हा विक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम कोणीही केला नव्हता.

ROHIT SHARMA – 650 SIXES IN INTERNATIONAL CRICKET. ONE & ONLY HITMAN 🥶pic.twitter.com/ENstT40dz6 — Johns. (@CricCrazyJohns) January 11, 2026

IND vs NZ 1st ODI: किवींचे भारताला ३०१ धावांचे तगडे आव्हान! डॅरिल मिशेलची शानदार खेळी, आता रोहित-कोहलीवर सर्वांच्या नजरा

रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर

याव्यतिरिक्त, रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर बनला आहे आणि त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ३२९ षटकार मारले आहेत, तर गेलने सलामीवीर म्हणून ३२८ षटकार मारले आहेत.

सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या सलामीवीरांची यादी:

फलंदाज देश षटकार (सलामीवीर म्हणून)
रोहित शर्मा भारत ३२९
ख्रिस गेल वेस्ट इंडिज ३२८
सनथ जयसूर्या श्रीलंका २६३
मार्टिन गुप्टिल न्यूझीलंड १७४
सचिन तेंडुलकर भारत १६७

रोहित शर्माचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३ शतके

रोहित शर्माने २००७ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सुरुवातीला तो चांगला खेळला नाही. तथापि, महेंद्रसिंग धोनीने त्याला डावाची सुरुवात करण्यासाठी बढती दिली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने २८० एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ११,५४२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ३३ शतके आणि ६१ अर्धशतके आहेत.

Cricket News: क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या ‘या’ पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे काम

Web Title: Rohit sharma breaks chris gayle record 650 international sixes world record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs NZ
  • Rohit Sharma
  • Sports News

संबंधित बातम्या

रोहित अन् विराट संघातून बाहेर पडणार? ‘गेल्या दशकापासून ते…’ Shubhman Gill चे मोठे विधान
1

रोहित अन् विराट संघातून बाहेर पडणार? ‘गेल्या दशकापासून ते…’ Shubhman Gill चे मोठे विधान

औद्योगिक क्रीडा स्पर्धेत ‘टाटा मोटर्स’चा दबदबा! विजेतेपदावर कोरलं नाव, बजाज ऑटो उपविजेता
2

औद्योगिक क्रीडा स्पर्धेत ‘टाटा मोटर्स’चा दबदबा! विजेतेपदावर कोरलं नाव, बजाज ऑटो उपविजेता

क्रिकेटविश्वात खळबळ! एकदिवसीय सामने 40 ओव्हर्सचे होणार? ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
3

क्रिकेटविश्वात खळबळ! एकदिवसीय सामने 40 ओव्हर्सचे होणार? ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?
4

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.