
IND vs NZ ODI Series: A monumental achievement awaits Virat Kohli! By scoring 63 runs, he will shatter the record of this Australian legend.
Virat Kohli is aiming for Ricky Ponting’s record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दूसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे खेळला गेला असून या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. तर आता राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारत विजय मिळवून मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात ९३ धावांची विजयी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला दुसऱ्या सामन्यात एक विक्रम खुणावत आहे.
वडोदरा येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलेल्या विराट कोहलीचे आता रिकी पॉन्टिंगला मागे टाकण्याचे उद्दिष्ट असणार आहे. ही कामगिरी साध्य करण्यासाठी त्याला ६३ धावांची आवश्यकता आहे. विराट कोहली गॉर्डन ग्रीनिजला मागे टाकेल आणि नंतर वेस्ट इंडिजचा महान विवियन रिचर्ड्सचा विक्रम मोडण्यावर तेचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा : IND vs NZ : राजकोटमध्ये भारताची आकडेवारी चिंता वाढवणारी! न्यूझीलंड ठरू शकतो वरचढ; वाचा सविस्तर
जर विराट कोहली राजकोटमध्ये ६३ धावा पूर्ण केल्या तर तो लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत (एकत्रित एकदिवसीय आणि घरगुती एकदिवसीय) ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंगला मागे टाकेल. सध्या, याबाबत दोघांमध्ये ६३ धावांचे अंतर आहे.
आकडेवारी बघितली तर, विराट कोहलीने ३४५ लिस्ट ए सामन्यांमधील ३३२ डावांमध्ये १६,३०० धावा फटकावल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ५७.८० आहे. कोहलीने ५८ शतके आणि ८६ अर्धशतके देखील आहेत. दरम्यान, रिकी पॉन्टिंगने ४५६ सामन्यांमधील ४४५ डावांमध्ये ४१.७४ च्या सरासरीने १६,३६३ धावा केल्या असून यामध्ये त्याने ३४ शतके आणि ९९ अर्धशतके झळकवली आहेत. या यादीमध्ये विराट कोहलीची सरासरी आणि शतकांची संख्या सर्वात प्रभावी दिसून येत आहे. कोहली प्रथम ग्रीनिज (१६,३४९ धावा) आणि नंतर पॉन्टिंगला मागे टाकेल. त्यानंतर, त्याचे पुढील लक्ष्य विवियन रिचर्ड्स (१६,९९५ धावा) यांच्या विक्रमावर असणार आहे.
हेही वाचा : IND vs NZ : राजकोटमध्ये श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची संधी! ‘किंग’ कोहलीला टाकणार मागे? वाचा सविस्तर
भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, आयुष बदोनी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.
न्यूझीलंड संघ : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मिचेल हे (यष्टीरक्षक), निक केली, हेन्री निकोल्स, विल यंग, जोश क्लार्कसन, जॅक फॉल्ड्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, आदित्य अशोक, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स, मायकेल रे.