श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
Shreyas Iyer can create history in Rajkot : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे ११ जानेवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला. या मालिकेतील दुसरा सामना राजकोटमध्ये खेळला जाणार असून या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर एक मोठा विक्रम करण्याची शक्यता आहे. या एकदिवसीय सामन्यात तो सर्वात जलद ३, ००० धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे.
श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरला असून तो न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला देखील. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात अय्यरने ४७ चेंडूत ४९ धावा करून आपली सिध्दता दाखवलीए आहे. आता, तो राजकोट येथे होणाऱ्या सामन्यात, विराट कोहलीला मागे टाकू शकतो. श्रेयस अय्यर राजकोटमध्ये त्याचा ६९ वा डाव खेळणार आहे. या सामन्यात ३४ धावा करताच तो ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण करणार आहे. जर त्याने ही कामगिरी केली तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३,००० धावा पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज बनणार आहे.






