
IND vs NZ: Ishan Kishan's storm in Raipur! He smashed a quick half-century with a flurry of fours and sixes.
IND VS NZ 2nd T20l Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत २०२८ धावा केल्या आहेत. धावांचा पाठलाग करत इशान किशनने जलद अर्धशतक झळकवले. त्याने २१ चेंडूत ५१ धावा पूर्ण केल्या.
भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. न्यूझीलंड संघाने रचीन रवींद्रच्या ४४ धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर ६ गडी गामावत २०८ धावा केल्या आणि भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा भोपळा न फोडता माघारी गेला आणि संजू सॅमसन देखील ६ धावा करून माघारी गेला. त्यानंतर आलेला इशान किशनने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत डाव सावरला आणि जलद अर्धशतकही झळकवले. त्याने २१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. इशान आता ३१ चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार लगावले आहे. त्याला ईश सोढीने बाद केले. दुसऱ्या बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादव १८ चेंडूत ३९ धावांवर खेळत आहे. भारताला आता विजयासाठी ८१ धावांची गरज आहे.
Sublime striking! 🔥 🎥 Ishan Kishan gets to his fifty in some style 👏 Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @ishankishan51 pic.twitter.com/x4RK92sjmJ — BCCI (@BCCI) January 23, 2026
भारताचा संघ :भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (w), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंडचा संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी