सूर्यकुमार यादव आणि मिचेल सँटनर(फोटो-सोशल मीडिया)
IND VS NZ 2nd T20l Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथील जामठा स्टेडियमवर खेळला गेला होता. भारताने या सामन्यात न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने बुमराहला विश्रांती दिली आहे, तर हर्षित आणि कुलदीप संघात स्थान देण्यात आले आहे.
दुसऱ्या टी-२० सामन्यात देखील सूर्याआर्मी आपली विजयी लय कायम राखत मालिकेत आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर नुकतेच एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव करून २-१ अशी मालिका जिंकून न्यूझीलंडने इतिहास रचला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात जरी पराभव पत्करावा लागला असला तरी न्यूझीलंडचा संघ रायपूर येथील सामन्यात दमदार पुनरागमन करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हटले की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. तिथे आधीच थोडं दव आहे, आम्ही अलीकडच्या काळात लक्ष्याचा पाठलाग केलेला नाही, त्यामुळे आम्हाला पाठलाग करायचा आहे. खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही प्रत्येक सामना खेळतो, आम्ही प्रत्येक बाबतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही प्रत्येक विभागात त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. आमच्या संघात दोन बदल आहेत – अक्षरला काल रात्री दुखापत झाली, बुमराहला विश्रांती दिली आहे, हर्षित आणि कुलदीप संघात आले आहेत.”
किवी संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस गमावल्यावर म्हटले की, “आम्हीही प्रथम गोलंदाजीच केली असती. जेव्हा तुम्ही त्यांच्या परिस्थितीत एका दर्जेदार संघाविरुद्ध खेळता, तेव्हा तुम्ही काहीतरी शिकता. आमच्या संघात तीन बदल आहेत – रॉबिन्सनच्या जागी सीफर्ट, क्लार्कच्या जागी फाउल्क्स आणि मॅट हेन्रीचाही संघात समावेश आहे.”
🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and elected to bowl first in the 2⃣nd T20I. Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/AcBcPlcKFZ — BCCI (@BCCI) January 23, 2026
हेही वाचा : विराट कोहलीच्या मनाविरुद्ध कसोटी निवृत्तीचा निर्णय? ‘या’ दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट जगतात वादळ
भारताचा संघ :भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (w), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंडचा संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी






