ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan squad announced for the T20 series against Australia : ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान दौरा करणार आहे. पाकिस्तानकडून जाहीर करण्यात आलेल्या संघात बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना संधी देण्यात आली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा बाबर आझमला टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे.तर जखमी शाहीन शाह आफ्रिदीचाही १६ सदस्यीय संघात समावेश केला गेला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या संघात कोणते देखील बदल करण्यात आलेले नाहीत. या मालिकेसाठी हरिस रौफकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे टी-२० विश्वचषकासाठी हरिस रौफ संघाचा भाग राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : विराट कोहलीच्या मनाविरुद्ध कसोटी निवृत्तीचा निर्णय? ‘या’ दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट जगतात वादळ
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग दरम्यान क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धा सोडून लाहोरमधील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये उपचारासाठी मायदेशी परतला होता. त्यानंतर, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही.
ऑस्ट्रेलियाचा संघ २८ जानेवारी रोजी पाकिस्तानमध्ये दाखळ होणार आहे. एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या भूमीवर या फॉरमॅटमध्ये दुसरी मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांची टी-२० मालिका २९ आणि ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी खेळवली जाणार आहे. सर्व सामने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.
पाकिस्तानच्या निवडकर्त्यांकडून अद्याप विश्वचषकासाठी त्यांचा अंतिम संघ जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यान, अफवा वाढत आहेत की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या समर्थनार्थ स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ भारतात पाठवण्यास अधिकृतपणे नकार दिला आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा! सरकारच्या निर्णयामुळे नाराजीचा सुर
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, सीम शाह, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसाहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान (उमराव खान), उम्मेद खान (विकेटकीपर).






