फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीचे झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशला पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यांमध्ये यजमान संघ पाकिस्तानला पराभूत करून सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दुबईतील आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी यजमान पाकिस्तानला हरवल्यानंतर, भारतीय संघाला गटातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यापूर्वी एक आठवड्याचा ब्रेक मिळाला. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आता एकही सामना न गमावता २ मार्च रोजी आमनेसामने येणार आहेत.
अफगाणिस्तानच्या शानदार विजयानंतर शोएब अख्तर आणि इरफान पठाणची प्रतिक्रिया, सोशल मीडिया Video Viral
भारताचा संघ आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी सराव करत आहे. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर, भारतीय संघ बुधवारी सरावासाठी मैदानात आला. वडिलांच्या निधनामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला गेलेले गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल संघात सामील झाले आहेत. तसेच, व्हायरल तापाने ग्रस्त असलेला यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत देखील संघासोबत सराव सत्रात सामील झाला. आता टीम इंडियाच्या काही खेळाडूंच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघाचा स्टार युवा सलामीवीर शुभमन गिल संघासोबत नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती ठीक नाही. मात्र, त्याचे काय झाले हे कळू शकले नाही. तिसऱ्या सामन्यापूर्वी तो बरा होईल अशी आशा आहे. जर तो तंदुरुस्त नसेल तर राहुल सलामीला येऊ शकतो आणि पंत राहुलच्या जागी खेळू शकतो, म्हणूनच पंतला भरपूर फलंदाजीचा सराव देण्यात आला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मालाही अडचणी आल्या. त्याला सामना अर्ध्यावर सोडावा लागला. तो बुधवारी संघासोबत आला पण त्याने फलंदाजीचा सराव केला नाही. अशा परिस्थितीत त्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Ready to go again on Super Sunday 🙌#TeamIndia | #ChampionsTrophy | #PAKvIND pic.twitter.com/wzgEvycPWG
— BCCI (@BCCI) February 22, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघासोबत नसलेल्या मॉर्केलने भारतीय गोलंदाजांवर विशेष लक्ष दिले. पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध पाच विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अस्वस्थ दिसत होता. त्याला सामन्यात कोणतेही यश मिळाले नाही, अशा परिस्थितीत गोलंदाजी प्रशिक्षकाचे पुनरागमन संघाला खूप दिलासा देणारे ठरले असते.
भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणाऱ्या गिलने गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये ८१.२ च्या सरासरीने ४०६ धावा केल्या आहेत. तो पाकिस्तानविरुद्ध सलग पाचव्यांदा ५०+ धावा काढण्याच्या मार्गावर होता पण अबरार अहमदच्या एका शानदार चेंडूने तो बाद झाला. त्याचा आजार भारतीय संघासाठी धक्कादायक आहे.