फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अफणिस्तान विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन ट्रॉफी सामना : अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्या मनोरंजक सामान्याने सर्वानीच उत्साह साजरा केला. यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने कमालीची कामगिरी करून इंग्लंडला पराभूत केले आणि सेमीफायनलच्या शर्यतीमध्ये कायम आहेत. गुणतालिकेमध्ये सुद्धा आता दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये उपांत्य फेरीची शर्यत सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडवर मिळवलेल्या शानदार विजयानंतर, इरफान पठाण आणि शोएब अख्तर यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. अफगाण संघाने बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी इंग्लंडला बाद करून स्पर्धेतील सर्वात मोठा अपसेट घडवून आणला.
Champions Trophy 2025 मध्ये इब्राहिम जादरानने इतिहास रचण्यानंतर सांगितले, उघड केले यशाचे रहस्य
अफगाणिस्तानच्या विजयानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात आनंदाची लाट पसरली आहे. हा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे ज्यामुळे प्रत्येकजण त्यांचे चाहते बनत आहे. अफगाणिस्तानच्या संघाने मागील काही वर्षांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि चाहत्यांची मन जिंकली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, एक वेळ अशी होती जेव्हा अफगाणिस्थानच्या संघाकडे खेळण्यासाठी साहित्य नव्हते त्यावेळी त्यांना मुंबई क्रिकेट बोर्डने शिल्लक असलेले साहित्य पुरवले होते आणि आता त्यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर ते अनेक मोठ्या संघाना मागे टाकण्यात यशस्वी झाले आहेत.
तुम्हाला सांगतो की, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून ३२५ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त ८ धावांनी मागे होता. इंग्लंडचा संघ ४९.५ षटकांत ३१७ धावांवर ऑलआउट झाला. या विजयानंतर इरफान पठाण ‘अफगाण जलेबी’ गाण्यावर नाचताना दिसला. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे-
दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने अफगाणिस्तानच्या विजयाच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, व्हिडिओमध्ये तो संघाला विजयासाठी अभिनंदन करतानाही दिसत आहे. अफगाणिस्तानच्या विजयाच्या क्षणाव्यतिरिक्त, शोएब अख्तरने आणखी काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
What a win…. pic.twitter.com/lG2k8REtMN
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) February 26, 2025
इंग्लंडविरुद्ध अफगाणिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी उत्कृष्ट होती. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ३२५ धावा केल्या. अफगाणिस्तान संघाकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक १७७ धावा केल्या. याशिवाय अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाईने ४१ धावा केल्या. यानंतर, गोलंदाजीतही अझमतुल्ला उमरझाईचा कहर दिसून आला. गोलंदाजी करताना त्याने ९.५ षटकांत ५८ धावा देत ५ बळी घेतले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीवर इब्राहिम झद्रानच्या १७७ धावांच्या खेळीने सावली टाकली.