
भारताचा अभूतपूर्व विजय, अभिषेक शर्माचा महत्त्वाचा वाटा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तत्पूर्वी न्यूझीलंडचा समाचार भारतीय बॉलर्सने घेतला. जसप्रीत बुमराह, रवी बिष्णोई यांच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडला धावांचा डोंगर रचता आला नाही आणि ५ ओव्हर्स शिल्लक ठेवतच भारतीय फलंदाजांची न्यूझीलंडचा धुव्वा उडवला असल्याचे दिसून आले.
संजू सॅमसन लगेच झाला आऊट
भारताला पहिला धक्का संजू सॅमसनच्या रूपात बसला, जो डावाच्या पहिल्याच चेंडूवर हेन्रीने क्लीन बोल्ड झाला. संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला, परंतु इशान किशन आणि अभिषेक शर्मा पूर्ण जोमात असून त्यांनी दोन षटकांत धावांचा पाऊस पाडला. भारताला दुसरा धक्का इशान किशनच्या रूपात बसला, जो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता आणि १३ चेंडूत २८ धावांवर सोधीने त्याला झेलबाद केला. चॅपमनने एक शानदार झेल घेतला. यावेळी संघाची धावसंख्या ३.२ षटकांत २-५३ अशी होती.
IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video
अभिषेक आणि सूर्याने केली तुफान खेळी
इशान किशन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर अभिषेकने 6-4 चा तडाखा लावत केवळ १५ ओव्हर्समध्येच भारताला सामना जिंकून दिला. यावेळी त्याला नेहमीप्रमाणे कॅप्टन सूर्यकुमार यादवची साथ लाभली. दोघांनीही दोन्ही बाजूने गड लढवत भारताला ही मालिका जिंकून दिली आणि चाहत्यांना खूष केले.
अभिषेकचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एकही धाव न घेता बाद झालेल्या अभिषेक शर्माने तिसऱ्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली आणि किवी गोलंदाजांना उत्तर दिले. अभिषेकने या सामन्यात फक्त १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तेव्हा ते टी-२० सामन्यातील भारतीय खेळाडूंकडून दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. या यादीत युवराज सिंग अव्वल स्थानावर आहे, ज्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. आता, त्याचा शिष्य अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि त्याने फक्त १४ चेंडूत हा विक्रम केला आहे.
IND vs NZ 3rd T20I: पुन्हा एकदा भारताने न्यूझीलंडला रडवले, 154 धावांचे आव्हान
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारे खेळाडू:
अभिषेक शर्मा जागतिक क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्य संघांविरुद्ध संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. युवराज सिंग या यादीत अव्वल आहे, तर नामिबियाचा खेळाडू जॅन फ्रायलिंक आहे, ज्याने झिम्बाब्वेविरुद्ध फक्त १३ चेंडूत अर्धशतक झळकावले. अभिषेक शर्मा आता कॉलिन मुनरोसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २०१६ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.