रवी बिष्णोईचे दमदार कमबॅक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या खेळात केलेल्या दोन मोठ्या बदलांमध्ये, लेग स्पिनर रवी बिश्नोई बऱ्याच काळानंतर पुनरागमन करताना दिसत आहे आणि इतकंच नाही तर त्याने अत्यंत उत्तम स्पेल टाकत २ महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या आहेत आणि पुन्हा एकदा आपलं अस्तित्व जाणवून दिलंय.
रवी बिश्नोई ३५७ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला
कर्णधार सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल जाहीर केले. त्याने दुसऱ्या टी२० सामन्यात न खेळणारा जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांचा समावेश करण्याची घोषणा केली. बिश्नोईने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी २०२५ मध्ये मुंबई क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान खेळला होता. ३५७ दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर तो आता प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.
संघात परतल्यानंतर त्याने केवळ १२ धावा देत महत्त्वाच्या २ विकेट्स घेत निवड झाली असल्याचे योग्य आहे हेच दाखवून दिले आहे. दरम्यान सगळेच जण रवी बिष्णोईचं कौतुक करताना दिसून येत आहे.
रवी बिश्नोईची कारकीर्द कशी आहे
रवी बिश्नोई सुरुवातीला या मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघाचा भाग नव्हता, परंतु वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीनंतर त्याचा समावेश करण्यात आला. बिश्नोईने आतापर्यंत एकूण ४२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यांनी १९.३७ च्या सरासरीने ६१ विकेट्स घेतल्या आहेत. एका सामन्यात बिश्नोईची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी १३ धावांत ४ विकेट्स आहे. यापुढे रवी बिष्नोईला अधिक मॅचमध्ये घेतल्यास त्याचा रेकॉर्ड नक्कीच चांगला होऊ शकतो आणि त्याची भेदक गोलंदाची अधिक वेळ पाहण्याची संधी चाहत्यांना मिळू शकते.
तिसऱ्या T20I साठी टीम इंडियाचे प्लेइंग 11: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.






