जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडच्या खेळाडूचा काढला घाम (फोटो सौजन्य - Instagram)
तिसऱ्या टी-२० मध्ये बुमराहने आपला पहिला चेंडू टाकला तेव्हा त्याच्यासमोरील किवी फलंदाज टिम सेफर्ट अवाक् झाला. कारण बुमराहने पहिल्याच चेंडूवर त्याला क्लिनबोल्ड केले आणि त्याला त्याचा अंदाजही आला नाही. यानंतर मैदानात एकच जल्लोष झाला होता.
सेफर्ट बुमराहच्या चेंडूवर झाला क्लिनबोल्ड
दुसऱ्या टी-२० साठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली तेव्हा कर्णधार सूर्याला या निर्णयाबद्दल बरीच टीका झाली. तिसऱ्या टी-२० मध्ये जसप्रीत बुमराहला डावाचा सहावा षटक टाकण्याची संधी देण्यात आली. बुमराहने त्याच्या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू ऑफ-स्टंपकडे किंचित कोनात टाकला. या चेंडूचा सामना करताना, टिम सेफर्टने चेंडूच्या रेषेचा पूर्णपणे चुकीचा अंदाज लावला आणि चेंडू त्याच्या बॅटजवळून गेला आणि थेट ऑफ-स्टंपवर गेला. टिम सेफर्टला गोलंदाजी केल्यानंतर थोडे आश्चर्य वाटले, तर जसप्रीत बुमराह पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यानंतर खूप आनंदी दिसला.
Ravi Bishnoi एक वर्षाने कमालीचे Comeback, 12 रन्स देत 2 विकेट्स घेत ठरवला विश्वास सार्थ
पॉवरप्लेमध्ये किवी संघाने फक्त ३६ धावा काढल्या
या टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. तथापि, तिसऱ्या टी२० सामन्यात खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला पहिल्या सहा षटकांत फक्त ३६ धावा करता आल्या आणि तीन विकेट गमावल्या. हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडिया या सामन्यात दोन बदलांसह खेळत आहे, ज्यामध्ये बुमराह व्यतिरिक्त रवी बिश्नोईचा समावेश आहे. बुमराह हा भारतीय टीमसाठी नेहमीच अफलातून कामगिरी करतो आणि या सामन्यातही त्याने ही अपेक्षा सार्थ ठरवली आहे. या संपूर्ण सामान्यात बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने न्यूझीलंडचा कणाच मोडून काढला आणि न्यूझीलंडचा डाव केवळ १५३ धावांमध्ये गडगडला. भारतासमोर १५४ धावांचे आव्हान असून मालिका जिंकण्यासाठी भारत खेळत आहे.
पहा व्हायरल व्हिडिओ
Jasprit Bumrah into the attack… ..And he starts off with a beauty 🤩🎯 Updates ▶️ https://t.co/YzRfqi0li2#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/CtrzYiAXgA — BCCI (@BCCI) January 25, 2026
IND vs NZ 3rd T20I: पुन्हा एकदा भारताने न्यूझीलंडला रडवले, 154 धावांचे आव्हान






