फोटो सौजन्य – सोशल मिडीया
शिखर धवन, हरभजन सिंग सारख्या अनुभवी भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्यानंतर, हा सामना रद्द करण्यात आला आहे. WCL ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याची अधिकृत घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा WCL सामना आज म्हणजे रविवार, 20 जुलै रोजी खेळला जाणार होता. एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही स्तरावर क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंनी या सामन्यात सहभागी होण्यास नकार दिला.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड पुन्हा एकदा आज भिडणार! Vaibhav Suryavanshi जलवा दाखवणार?
WCL ने त्यांच्या अधिकृत निवेदनात लिहिले आहे की, “WCL मध्ये आम्ही नेहमीच क्रिकेटला महत्त्व दिले आहे आणि त्यावर प्रेम केले आहे आणि आमचे एकमेव उद्दिष्ट चाहत्यांना काही चांगले, आनंदी क्षण देणे आहे. अनेक वृताच्या माहितीनुसार असे म्हटले जात होते की, पाकिस्तान हॉकी संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. बातमी ऐकल्यानंतर आणि अलिकडेच झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान व्हॉलीबॉल सामना खेळवण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील विविध खेळांचे काही इतर सामने पाहिल्यानंतर, आम्ही WCL मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने सुरू ठेवण्याचा विचार केला – जेणेकरून जगभरातील लोकांसाठी काही आनंदी आठवणी निर्माण होतील.”
पण या प्रक्रियेत आपण अनेकांच्या भावना दुखावल्या असतील आणि त्यांच्या भावना भडकवल्या असतील. त्याहूनही अधिक म्हणजे, देशाला इतके वैभव मिळवून देणाऱ्या आपल्या भारतीय क्रिकेट दिग्गजांना आपण अनवधानाने त्रास दिला आणि खेळाच्या प्रेमापोटी आम्हाला पाठिंबा देणाऱ्या ब्रँड्सनाही आपण प्रभावित केले.
म्हणून आम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भावना दुखावल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो आणि आशा करतो की लोक समजून घेतील की आम्हाला चाहत्यांसाठी काही आनंदाचे क्षण आणायचे होते.”
तुम्हाला सांगतो की, शिखर धवनने त्याच्या सोशल मिडीयावर अधिकृतपणे सांगितले की तो पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही. त्याने एक्स वर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, “मी ११ मे रोजी उचललेल्या पावलावर अजूनही ठाम आहे.त्याने त्याच्या देशाबद्दल प्रेम व्यक्त केले आणि माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि माझ्या देशापेक्षा मोठे काहीही नाही असे सांगितले.”
Jo kadam 11 May ko liya, uspe aaj bhi waise hi khada hoon. Mera desh mere liye sab kuch hai, aur desh se badhkar kuch nahi hota.
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/gLCwEXcrnR
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 19, 2025
शिखर धवन व्यतिरिक्त हरभजन सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना आणि युसूफ पठाण हे देखील या सामन्याचा भाग होऊ इच्छित नाहीत असे वृत्त आहे. भारताने या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड केली आहे, त्यामुळे जर ५ खेळाडू खेळले नाहीत तर १० खेळाडूंसह प्लेइंग इलेव्हन बनवणे शक्य होणार नाही.