फोटो सौजन्य – Youtube (England Cricket)
भारत विरुद्ध इंग्लंड : भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 संघाचा आजपासून दुसऱ्या कसोटी सामना खेळवला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये अनेक अंडर नाईन्टीन संघामधील युवा खेळाडूंना संधी मिळाली होती. आयपीएल २०२५ मध्ये अंडर नाईनच्या संघांमधील अनेक युवा खेळाडूंनी आयपीएलमध्ये कहर केला होता. यामध्ये आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी यासारख्या मोठ्या नावाचा समावेश होता. आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स साठी आयुष म्हात्रे यांनी चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय युवा खेळाडू अंडर 19 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
IND vs ENG : मालिकेत बरोबरी! इंग्लडला पावसाचा झाला फायदा, भारताला 8 विकेट्सने केले पराभुत
सध्या भारताचा संघ आयुष म्हात्रेचे नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. यामध्ये भारताच्या युवा संघाने पहिल्या सामन्यापासुनच त्याचा दबदबा दाखवला मालिका जिंकून कहर केला होता. त्याचबरोबर वैभव सूर्यवंशी यांनी देखील संघासाठी चांगली कामगिरी करत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 संघांमध्ये सध्या कसोटी मालिका सुरू आहे. यामध्ये पहिला सामना हा अनिर्णित राहिला.
आजपासून दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. वैभव सुर्यवंशी याने पहिल्या सामन्यांमध्ये फलंदाजी खराब केली होती पण गोलंदाजी त्याने कमाल दाखवले. आता भारतीय क्रिकेट चाहत्याच्या नजरा या वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर खेळल्या आहेत. वैभव सूर्यवंशी याने एकदिवसीय मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा या सामन्याला सुरुवात ही भारतीय वेळेनुसार तीन वाजून 3.30 मिनिटांनी होणार आहे.
आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. पहिल्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या खराब फलंदाजीमुळे संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कर्णधारपद देखील बदलण्यात आले आहे. भारताच्या संघाने हा सामना जिंकला तर भारताच्या संघाच्या हाती मालिका लागु शकते. भारताच्या युवा खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली त्याचबरोबर सोशल मिडीयावर या युवा खेळाडूचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आता क्रिकेट चाहत्याच्या नजरा या दुसऱ्या कसोटी सामन्यावर असणार आहेत.
आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशी हा राजस्थान राॅयल्सकडून खेळत होता. त्याने त्याच्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात 36 चेंडूमध्ये शतक पुर्ण केले होते आणि सर्वाचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये पदार्पण करणार सर्वात युवा खेळाडू देखील ठरला आहे.