IND VS PAK: '... Then fight the war!' Surya dedicates victory to Pahalgam victims, former Pakistani captain starts crying..
Asia cup 2025 : आशिया कपमध्ये(Asia cup 2025 )भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी महामुकाबला झाला. आशिया कपमधील सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानी संघाला वाईटरित्या पराभूत केले. पण भारताच्या या विजयापेक्षाही भारतीय कर्णधार आणि खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे.
यानंतर अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि टीमवर संतापलेले दिसत आहे. अशातच माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी राग व्यक्त करत म्हटले की, जर हे प्रकरण पहलगामशी संबंधित असते तर आपण युद्ध देखील लढायला हवे होते. भारतीय संघाच्या या कृतीच्या निषेधार्थ सलमान अली आगा याला सामन्यानंतरच्या सादरीकरणाला पाठवण्यात आले नाही.
हेही वाचा : OMAN vs UAE : ओमान संघाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; यूएई घरच्या मैदानावर विजयाच्या शोधात
सूर्यकुमार यादव आणि टीमने पाकिस्तानल पराभूत करत भारतीय चाहत्यांना आनंद दिला. त्यांनी प्रथम मैदानावर पाकिस्तानवर एकतर्फी पद्धतीने पराभूत करण्यात एष मिळवले. या विजयानंतर भारतीय संघाने पाकिस्तान संघासोबत हस्तांदोलन करणे टाळले. त्याच वेळी, सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवकडून पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना आणि पीडित कुटुंबांना विजय समर्पित करण्यात आला.
भारतीय संघाने केलेल्या या कृतीनंतर पाकिस्तान संघाला राग येणार नाही तर नवलच. प्रथम पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध सामना गमवाला लागला आणि त्यांनंतर भारतीय संघाकडून लक्ष देण्यात आले नाही. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी यावर प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की जर हे प्रकरण पहलगामशी संबंधित असेल तर युद्ध लढा.असा अजब सुर पाकिस्तानी माजी कर्णधाराने लावला.
माजी पाकिस्तानी कर्णधार रशीद लतीफ म्हणाले की, “युद्ध किंवा पहलगाम हल्ल्याबद्दल तुमचे आक्षेप योग्य आहेत. पण जेव्हा तुम्ही मैदानावर येत असतात तेव्हा खेळ योग्य पद्धतीने खेळायला पाहिजे. जर पाकिस्तान पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असेल तर जबाबदार असलेल्यांना जरूर पकडा. त्यांनी युद्ध लढायला हवे होते, मागे हटायला नको होते.’ असे लतीफ म्हणाले.
लतीफ पुढे असे देखील म्हणाले, “यापूर्वी देखील युद्धे झाली आहेत, परंतु आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले आहे. या गोष्टी आम्हाला आता आयुष्यभरासाठी कलंकित करणार आहेत. सुनील गावस्कर त्यांच्या सर्व मुलाखतींमध्ये जावेद मियांदाद यांचा उल्लेख करायचे, परंतु त्यांच्याकडून कधीही असे म्हटले गेले नाही की ते हस्तांदोलन करणार नाहीत. आम्ही आमच्या देशांचे प्रतिनिधित्व करत असतो, परंतु मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, मैदानात जे काही घडले ते नक्कीच योग्य नव्हते.”