मुहम्मद वसीम आणि जतिंदर सिंग(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळवण्यात आले आहेत. तर आज अरब अमिराती आणि ओमान यांच्यात सातवा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यापूर्वी ओमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. आजचा हा सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
यूएई आणि ओमान या दोन संघांनी आशिया कप २०२५ स्पर्धेत आपला पहिला सामना गमावला आहे. या स्पर्धेत ओमान संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून ९३ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्याच वेळी, यूएई संघाला स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारताकडून ९ विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या संघाला पहिल्या विजयाच्या दिशेने घेऊन जण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
आता दोन्ही संघ आशिया कपमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करण्यास उत्सुक असणार आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ९ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये यूएईने पाच सामने जिंकले आहे तर ओमानने चार सामने आपल्या नावे केले आहेत.
आज खेळवण्यात येत असलेल्या यूएई आणि ओमान सामन्यात हवामान कसे असणार? याबाबत जाणून घेऊया. सोमवारी अबू धाबीमध्ये कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर किमान तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन खालील प्रमाणे
ओमान : जतिंदर सिंग (कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), शाह फैसल, हसनैन शाह, मोहम्मद नदीम, झिकारिया इस्लाम, सुफियान महमूद, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
UAE प्लेइंग इलेव्हन: मुहम्मद वसीम (सी), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (प), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग
बातमी अपडेट होत आहे..