
IND VS PAK, T20 World Cup 2026: Sri Lanka has devised a big plan for the India-Pakistan match! An impenetrable fortress of high-alert security is ready.
IND VS PAK, T20 World Cup 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी २० विश्वचषक २०२६ चा हायहोल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी या सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केल्याची बातमी समोर येत आहे. अधिकाऱ्यांकडून एएफपीला सांगण्यात आले की, स्पर्धेत सर्व संघांच्या सुरक्षेसाठी एलिट सशस्त्र तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. विशेष लक्ष भारत-पाकिस्तान सामन्यांवर केंद्रित करण्यात येणार आहे.
श्रीलंका भारतासोबत टी-२० विश्वचषक सह-यजमान आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये सर्व संघ किमान एकदा एकमेकांशी भिडणार आहे. भारत आणि पाकिस्तान १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये ग्रुप ए मध्ये एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत. श्रीलंकेकडून या सामन्यासाठी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
श्रीलंकेचे क्रीडामंत्री सुनील कुमारा गमागे यांनी सांगितले की “भारत-पाकिस्तान सामन्यावर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे.” पोलिस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सामान्यतः राष्ट्रप्रमुखांचे संरक्षण करणाऱ्या एलिट कमांडो युनिट्स संघांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे.”
एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की,”खेळाडूंना विमानतळापासून परत येईपर्यंत सशस्त्र रक्षकांनी संरक्षण देण्यात येणार आहे. पाकिस्तानने राजकीय कारणांमुळे भारतात सामने खेळण्यास नकार दर्शवला होता. ज्यामुळे आयसीसीने सामने श्रीलंकेतील तटस्थ ठिकाणी हलवले.
सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने देखील भारतात सामने खेळणे टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आयसीसीने त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतूनच माघार घेतली आणि त्यांच्या जागी आयसीसीने स्कॉटलंडचा समावेश करण्यात केला आहे.
क्रिकेट सचिव बंदुला दिसानायके यांच्याकडून सांगण्यात आले की, श्रीलंका भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वादात अडकण्यास तयार नाही. त्यांनी सांगितले की, गरज पडल्यास भविष्यात श्रीलंका कोणत्याही देशाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार असणार नाही.
श्रीलंकेनेही टी-२० विश्वचषकाचा वापर हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्थळांना अपग्रेड करण्याची संधी म्हणून केला आहे. कोलंबोच्या दोन स्टेडियमपैकी एक, सिंहली स्पोर्ट्स क्लब येथे नवीन फ्लडलाइट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करणे आणि खेळाडू आणि प्रेक्षकांना चांगला अनुभव देणे हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.