
IND Vs PAK : पोरांनी अखेरपर्यंत झुंज दिली, पण सामना हातचा गेला! पॉईंट टेबलमध्येही भारताची पिछेहाट
IND Vs PAK : एसीसी मेन्स अंडर-19 एशिया कप (Under-19 Asian Cup) मधील अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर 3 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने अर्जुन राजपूत (107)च्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद 209 धावांचे आव्हान पाकिस्तानला दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने पाकिस्तानला सुरुवातीला दणके दिले, पण हमजा जहूर (नाबाद 100) आणि हसनैन अब्बास धर (38) ही जोडी लवकर फोडू शकले नाहीत. परिणामी 48 व्या षटकात पाकिस्तानने 209 धावा पूर्ण करत आपला विजय साजरा केला.
तसंच, भारताने या सामन्यात आणखीन जास्त धावा काढल्या असत्या, तर पाकिस्तानला आस्मान दाखवण्याची नामी संधी मिळाली असती. मात्र तसं काही या सामन्यात घडलं नाही.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, खरा पण पहिल्या फळीतील सर्व फलंदाज झटपट बाद झाले. ज्यामुळे मागच्या फळीवर त्याचा दबाव आला होता. अशात अर्जुन राजपूतने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई सुरू केली व 85 चेंडूंत 11 चौकार व 5 गगनचुंबी षटकारांच्या जोरावर 107 धावांची दमदणीत शतकी खेळी खेळला. त्याच्या व अखेरच्या काळात काव्या पटेलने केलेल्या 23 धावांमुळे भारतीय संघ सन्मानजनक 200 धावांचा टप्पा पार करू शकला.
या सामन्यात वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागच्या फलंदाजीवर अनेकांच्या नजरा लागल्या होत्या, मात्र तो 22 धावांचेच योगदान देऊ शकला. सुरुवातीला भारताला मिळालेल्या दणक्याचा प्रभाव त्याच्या फलंदाजीवर पडल्याचे पाहण्यास मिळाले. तसेच राहुल द्रवीडचा मुलगा यष्टीरक्षक अन्वय द्रवीड अवघ्या 10 धावा करत बाद झाला.
भारतीय गोलंदाजांनी 209 धावांचा बचाव करताना सुरुवातीला सर्वोत्तम गोलंदाजी केली. एकवेळ पाकिस्तानची अवस्था 15 व्याच षटकात 5 बाद 61 धावा अशी होती. पण हमजा जहूर आणि हसनैन धर यांनी सहाव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी रचत भारतीय संघावर दबाव निर्माण केला. हमजाने 10 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या, तर त्याला साथ देणाऱ्या हसनैनने 38 धावांची खेळी केली.
Ans: एसीसी पुरुष अंडर-19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना झाला.
Ans: अर्जुन राजपूतने 85 चेंडूंत 11 चौकार आणि 5 षटकारांसह 107 धावांची खेळी केली.
Ans: आर्यवीर सेहवागने 22 धावा केल्या, तर अन्वय द्रविडला केवळ 10 धावा करता आल्या.