
Ind vs Pak : फक्त अर्जुनलाच 'रण'नीती कळली; बाकीचे ढेपाळले, भारताचे पाकिस्तानसमोर 209 धावांचे आव्हान
Ind vs Pak : अंडर-19 आशिया चषकातील (Under 19 Asia Cup) वनडे सामन्यात भारतीय अंडर-19 संघाची फलंदाजांची पहिली फळी अक्षरशः ढेपाळली. दरम्यान, पाचव्या क्रमांकावर आलेल्या अर्जुन राजपूत (107)ने एकाकी किल्ली लढवत आपले दमदार शतक साजर केले. त्याचमुळे भारत आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसमोर सर्वबाद बाद 208 धावांचे आव्हान देऊ शकला.
भारताने नाणेफेक जिंकले, पण निर्णय घेण्याचा कल मात्र चुकला. पहिल्या फळीत असलेले धुरंदर फलंदाज पाहती, भारत मोठाली धावसंख्या उभारेल असे वाटत होते, मात्र दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हा बार फुसका निघाला. कर्णधार लक्ष्य रायचंदानी असो वा आर्यवीर सेहवाग यांना खेळपट्टीवर टिकून खेळता आले नाही. कर्णधार साहेब तर भोपळाही न फोडता माघारी परतले.
अली रजाने लक्ष्यला टार्गेट करत त्याला क्लीनबोल्ड केले. तर तिसऱ्या क्रमांकावरी वि. के. विनित (8) असो वा यशबर्धन चौहान (1) आल्या पावली माघारी परतले. एक चौकार व एक षटकारासह सेहवाग (22)ने काही काळ खिंड लढवली, पण तो आपली विकेट टिकवू शकला नाही.
अनेक फलंदाज येत होते व आल्या पावली परतत होते, एकमेव अर्जुन टिकून राहिला. फक्त खेळपट्टीवर टिकलाच नाही तर समोरून कोणतीही मदत मिळत नसतानाही, त्याने पाक गोलंदाजांचा वचपा काढण्यास सुरुवात केली. 85 चेंडूंत तब्बल 11 चौकार व 5 गगनचुंबी षटकारांच्या जोरावर 125 च्या सरासरीने 107 धावांची शतकी खेळी केली. त्याने मनल चौहान (11)च्या साथीने 64 धावांची भागीदारी रचली, ज्यात अर्जुनच्या 50 धावांचा समावेश होता. अखेरच्या काव्या पटेलने (23 ) ही दमदार फलंदाजी केली, ज्यामुळे भारताने 200 चा आकडा पार केला.
दरम्यान, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. त्यांनी अर्जुन वगळता त्यांना हवी असलेली विकेट हाकेच्या अंतरावर मिळवत गेले. अली रजाने त्याची पायभरणी केली. त्याने 10 षटकात 37 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तर त्याला नकीब सकीफ व रिझवानउल्लाहने चांगली साथ दिली. या दोघांनाही प्रत्येकी 3 विकेट मिळाल्या. अशाप्रकारे या तिघांनी भारताच्या धावगतीवर अंकुश मिळवण्यास यश संपादन केले.
दरम्यान, भारताच्या गोलंदाजीलाही धार आहे. त्यामुळे फासे पलटायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे दुसरा डाव पाहणं रोमहर्षक असणार आहे.
Ans: अंडर-19 आशिया चषकातील वनडे सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले.
Ans: अर्जुन राजपूतने 85 चेंडूंत 107 धावांची दमदार खेळी केली.
Ans: त्याने 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले.