Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय

india beat nepal in U19 Asia cup aaryavir sehwag fifty: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या पहिल्या सामन्यात भारताने नेपाळला १० विकेटसने पराभूत केले. या सामन्यात आर्यवीर सेहवागने नाबाद ७० धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघाने सहज लक्ष्य गाठले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 06, 2026 | 06:55 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • U-19 आशिया कपमध्ये टीम इंडियाचा जलवा
  • नेपाळविरुद्ध आर्यवीरचा तुफानी शो
  • भारताचा १० विकेट्सने दणदणीत विजय
IND vs NEP U19 Asia Cup 2026: ओमान येथे अंडर १९ आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने दणदणीत विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. भारतीय संघाने शुक्रवारी आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळला १० विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना नेपाळचा संघ १२८ धावांवर गारद झाला.

प्रत्युत्तरात, भारतीय संघाने एकही विकेट न गमावता अवघ्या १९.१ षटकांत हे लक्ष्य पूर्ण केले. भारताच्या या विजयाचा नायक माजी भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग होता. त्याने अवघ्या ५२ चेंडूंमध्ये ७० धावांची वादळी खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त, कर्णधार लक्ष्य रायचंदानीनेही शानदार अर्धशतक झळकावले आणि तो ५३ धावांवर नाबाद राहिला. (aaryavir sehwag)

Andre Russell: T20 क्रिकेटचा किंग! आंद्रे रसेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

आर्यवीर सेहवागची शानदार फलंदाजी

नेपाळविरुद्ध १२९ धावांचे लक्ष्य गाठताना, आर्यवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी नेपाळी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आणि वेगाने धावा केल्या. वडील वीरेंद्र सेहवागप्रमाणे आर्यवीरने मैदानाच्या सर्व बाजूंनी शानदार फटके मारले. त्याने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. आर्यवीर सात चौकार आणि चार षटकारांसह ५२ चेंडूंमध्ये ७० धावा करून नाबाद राहिला.

दरम्यान, कर्णधार लक्ष्यनेही शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ६३ चेंडूंचा सामना करत सात चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने एकही विकेट न गमावता केवळ १९.१ षटकांत लक्ष्य गाठले. भारताने नेपाळ १० विकेट्सने हरवले. विशेष म्हणजे, भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा अनन्या द्रविड याचाही या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश आहे. मात्र, नेपाळविरुद्धच्या या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

भारतीय गोलंदाजांनी नेपाळला १२८ धावांवर गुंडाळले

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या नेपाळ संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. नेपाळने ४.३ षटकांत अवघ्या १८ धावांत आपल्या पहिल्या दोन विकेट गमावल्या. यानंतर, ९ षटकांच्या आत नेपाळची धावसंख्या २७ धावांत ३ विकेट अशी झाली. भारतीय गोलंदाजांनी आपली भेदक गोलंदाजी सुरू ठेवली आणि नेपाळचा निम्मा संघ केवळ ९४ धावांवर तंबूत परतला. फलंदाजांना खेळण्याची संधीच दिली गेली नाही. ५१ धावांवर भारताला चौथे विकेट मिळाले. मनल चौहानने नीरज कुमार यादवला २० धावांवर बाद केले.

त्यानंतर दर्श सुथार ४३ धावा आणि आशिष लुहार २९ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या ९४ पर्यंत नेली. पण भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत नेपाळच्या पुनरागमनाच्या आशा धुळीस मिळवल्या. संपूर्ण नेपाळ संघ ४२.३ षटकांत १२८ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून ईशान सूद आणि अर्जुन राजपूत यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. यशवीर गौरने दोन, तर मनल चौहान आणि काव्या पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका मालिकेबाबत मोठी अपडेट! पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण बदलले; पाहा अपडेटेड शेड्यूल

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि नेपाळ यांच्यातील अंडर-19 आशिया कपचा सामना कुठे खेळवण्यात आला?

    Ans: भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना ओमानमध्ये खेळवण्यात आला.

  • Que: अंडर-19 आशिया कप मध्ये भारताने नेपाळचा किती विकेट्सने पराभव केला?

    Ans: भारतीय संघाने 19.1 षटकांत एकही विकेट न गमावता नेपाळचा 10 विकेट्सने दणदणीत पराभव केला.

  • Que: आर्यवीर सेहवागने नेपाळविरुद्ध किती धावा केल्या?

    Ans: आर्यवीर सेहवागने 52 चेंडूंमध्ये नाबाद 70 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.

Web Title: Ind vs nep india beat nepal by 10 wickets u19 asia cup 2026 aaryavir sehwag pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Aaryavir Sehwag
  • Asia Cup
  • indian cricket team
  • Nepal Cricket Team
  • Under 19 Asia Cup

संबंधित बातम्या

U-19 Asia Cup 2026: आज नेपाळला देणार भारताची युवा ब्रिगेड टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार सामना
1

U-19 Asia Cup 2026: आज नेपाळला देणार भारताची युवा ब्रिगेड टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार सामना

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
2

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.