फोटो सौजन्य - सोशल मिडिआ
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. त्याआधी सध्या सोशल मिडियावर या सामन्याच्या संदर्भात फक्त क्रिकेट प्रेक्षकांमध्येच नाही तर दोन्ही संघाच्या कोचच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील प्रशिक्षकांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाला. एकीकडे आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला विरोध होत आहे. दुसरीकडे दोन्ही देशांच्या प्रशिक्षकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
पाकिस्तानचे प्रशिक्षक माइक हॅन्सन यांनी त्यांच्या एका फिरकीपटूला जगातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हटले आहे. याला उत्तर देताना भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. सामन्यापूर्वी, दोन्ही संघांचे प्रशिक्षक शनिवारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मैदानी सामन्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी संघाचा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजला जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हटले.
Match 6 ⚔️
Arguably the most-anticipated match-up is here!
India are set to face Pakistan in what promises to be a humdinger! 🤜🤛#INDvPAK #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/Z81wvCau8o— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 14, 2025
पाकिस्तानी प्रशिक्षकाच्या टिप्पण्यांनी अनेकांना आश्चर्यचकित केले, कारण नवाज टी-२० क्रमवारीत ३० व्या स्थानावर आहे. शनिवारी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत यांनाही हेसनच्या टिप्पण्यांबद्दल विचारण्यात आले.
पत्रकार परिषदेत हेसन म्हणाले होते की, “मला वाटते की आमच्या संघाचे सौंदर्य हे आहे की आमच्याकडे पाच फिरकी गोलंदाज आहेत. आमच्याकडे मोहम्मद नवाज आहे, जो सध्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे आणि गेल्या सहा महिन्यांपासून तो संघात परतल्यापासून त्याची क्रमवारी अशीच राहिली आहे.”
स्पर्धेत भारताच्या फिरकीपटूंबद्दल बोलताना, रायन टेन डोइशेटने हेसनचा दावा पूर्णपणे नाकारला नाही तर प्रत्येकाला त्यांच्या खेळाडूंना त्यांच्या इच्छेनुसार क्रमवारी देण्याचा अधिकार आहे असे सांगितले. ड्यूश पुढे सांगितले की, मला वाटते की या स्पर्धेत फिरकीपटू खूप महत्त्वाचे असतील. सर्वसाधारणपणे फिरकी हा टी-२० क्रिकेटचा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. दोन्ही संघांकडे भरपूर फिरकी आहे. अर्थात आम्हाला वरुण, अक्षर आणि कुलदीपबद्दल कसे वाटते हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे.
भारताच्या संघाने या स्पर्धेची सुरुवता चांगली केली आहे आता टीम इंडियाची नजर दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे. भारताच्या संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास संघ हा सुपर 4 मध्ये स्थान पक्के करणार आहे.