
IND vs SA 1st Test: Jasprit Bumrah's Express is good! He did 'this' feat, leaving Mohammed Shami behind; became the first Indian..
Jasprit Bumrah surpasses Mohammed Shami : कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली आहे. त्याने १४ षटके टाळी आणि २७ धावा देत ५ बळी टिपले. यासह, कसोटी बळींच्या बाबतीत जसप्रीत बुमराहने भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मागे टाकले आहे.
जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ५ बळी घेतले आणि दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांत गारद केले. या पाच बळींमुळे जसप्रीत बुमराहच्या बळींची संख्या आता २३१ झाली आहे, तर मोहम्मद शमीच्या खात्यात २२९ कसोटी बळी जमा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये बळी टिपण्याच्याबाबतीत जसप्रीत बुमराहने शमीला मागे टाकले आहे.
हेही वाचा : IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा
मोहम्मद शमीने भारतासाठी ६४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २२९ फलंदाजांना माघारी पाठवले आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर जमा आहे. १९९० ते २००८ पर्यंत विनोद कुंबळेने भारतासाठी १३२ कसोटी खेळले असून त्यामध्ये त्याने ६१९ बळी टिपले आहेत. त्याच्या पाठोपाठ रविचंद्रन अश्विन (५३७), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), रवींद्र जडेजा (३३८), इशांत शर्मा (३११), झहीर खान (३११), बिशन सिंग बेदी (२६६), भागवत चंद्रशेखर (२४२) आणि जवागल श्रीनाथ (२३६) यांचा नंबर लागतो.
हेही वाचा : IND vs SA 1st Test : Jasprit Bumrah ची ऐतिहासिक कमाल! १७ वर्षांत केला पहिल्यांदाच ‘हा’ कारनामा
जसप्रीत बुमराहने रचला इतिहास
शुक्रवारी, १४ नोव्हेंबर रोजी बुमराहच्या पाच विकेट्ससह, तो १७ वर्षांमध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या रेड-बॉल सामन्याच्या पहिल्या दिवशी किमान पाच फलंदाजांना बाद करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. आजया सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ संपला असून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला भारतीय गोलंदाजांनी १५९ धावांवर गारद केले. जसप्रीत बूमराहने भारताकडून सर्वाधिक ५ बळी टिपले आहे. तर धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर १ बाद ३७ धावा केल्या आहेत. केएल राहुल १३ धावांवर तर वाॅशिग्टन सुंदर ६ धावांवर नाबाद आहे. भारताला यशस्वी जयस्वालच्या रूपात पहिला झटका बसला आहे.