
IND vs SA 1st Test: Sir Ravindra Jadeja's world record in WTC! 'Ha' Bheem becomes the first cricketer to achieve the feat
Ravindra Jadeja sets world record in WTC : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात पहिली कसोटी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इतिहासात २००० धावा आणि १५० बळींचा दुहेरी पराक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. ही कामगिरी करून जडेजाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एक मोठा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. शिवाय, जडेजा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात १५० बळी घेणारा तिसरा गोलंदाज देखील बनला आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. जडेजाच्या आधी, आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी १५० बळी घेण्याची किमया साधली आहे.
हेही वाचा : IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले
आर अश्विनने २०१९ ते २०२४ दरम्यान ४१ कसोटींच्या ७८ डावांमध्ये १९५ बळी टिपले आहे. जसप्रीत बुमराहने ४१ कसोटींच्या ७७ डावांमध्ये १८२ बळी घेण्याची किमया केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेतले आहेत, त्याने २०१९ ते २०२५ दरम्यान, लिऑनने ५३ कसोटी सामन्यांमध्ये ९५ डावात २१९ विकेट्स काढल्या आहेत.
याव्यतिरिक्त, कपिल देव, इयान बोथम आणि व्हेटोरी यांच्यानंतर रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेट इतिहासात ४,००० धावा आणि ३००+ बळी घेणारा चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. कपिल देव यांना मागे टाकून जडेजा हा टप्पा गाठणारा सर्वात जलद भारतीय खेळाडू असून जडेजाने ८७ कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम स्थापन केला आहे. जो बोथमच्या ७२ नंतरचा दुसरा सर्वात जलद विक्रम ठरला आहे.
हेही वाचा : IND vs SA पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल WTC पॉइंट्स टेबलवर कसा परिणाम करेल? भारत पहिल्या दोनमध्ये राहील का?