
IND vs SA 2nd ODI: South Africa wins the toss and will field first! Team India has a chance to take the lead in the series
IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजी करताना दिसणार आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलसमोर हा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकण्याचे लक्ष्य असणार आहे. तर विरोधी संघ हा सामना जिंकून मालिकेत आपले आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने बी मारली होती. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात टॉस गामवाणाऱ्या भारताने विराट कोहलीच्या १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर ३४९ धावा उभ्या केल्या होत्या. या सामन्यात विराट कोहलीच्या शतकासह केएल राहुलनेही ५६ चेंडूत ६० धावांचे योगदान दिले, तर रोहित शर्माने ५१ चेंडूत ५७ धावांचे योगदान दिले होते.
भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघाला ४९.२ षटकांत ३३२ धावाच करता आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून मॅथ्यू ब्रिट्झके (७२), मार्को जॅन्सेन (७०) आणि कॉर्बिन बॉश (६७) यांनी अर्धशतके झळकावली. मात्र त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. परिणामी संघाला १७ धावांनी पराभव पत्करावा लगाला. आता या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका पुनरागम करण्यास प्रयत्नशील असणार आहे.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईला ‘लॉर्ड्स’ पावला! शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आसामची फलंदाजी उद्ध्वस्त
दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन
भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रदीप सिंह,
दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जिओर्गी, 7 मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, 1नंदरे बुरगी, एनगिडी .
हेही वाचा : IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेचा दिवस ठरला? ‘या’ तीन स्टार खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी