भारतीय टी-२० संघ(फोटो-सोशल मीडिया)
India vs South Africa T20 series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची ही टी-२० मालिका ९ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा कधी करेल आणि कोणते खेळाडू संघात परतणार आहेत? याबद्दल महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणेकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. एका वृत्तांनुसार, बीसीसीआय ३ डिसेंबर रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची टी-२० मालिका खेळली असून या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला होता. त्या मालिकेत अनेक तरुण खेळाडूंच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने मालिका खिशात घातली. आता काही वरिष्ठ आणि नियमित खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : सरफराज खानची स्फोटक फलंदाजी! गोलंदाजांवर चढवला हल्लाबोल; निवडकर्त्यांना दिला इशारा
२०२५ च्या आशिया कप दरम्यान दुखापतीमुळे हार्दिक पंड्या भारतीय संघाबाहेर आहे. तथापि बातमी समोर येत आहे की हार्दिकची तंदुरुस्तीमध्ये झपाट्याने सुधार झाला आहे. तसेच तो आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत देखील आहे. त्यामुळे आता निवड समिती त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या पुनरागमनामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय संघाला अधिक बळकटी मिळेल.
शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मानेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्याला विश्रांती देण्यात आली होती. पहिल्या कसोटीनंतर त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. आता तो टी-२० मालिकेसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. गिल टी-२० स्वरूपात सातत्य आणि जलद धावगती दोन्ही प्राप्त करून देऊ शकतो. त्यामुळे संघात त्याची उपस्थिती संघाच्या टॉप ऑर्डरसाठी महत्त्वाची असणार आहे.
टी-२० स्वरूपात भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड बराच काळ उलटून गेला भारतीय संघाचा भाग नाही. त्याने २०२४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची टी-२० मालिका खेळली होती. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. त्यामुळे, निवडकर्ते त्याला बॅकअप ओपनर आणि लवचिक फलंदाज म्हणून पुन्हा संधी देण्याचा विचार करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईला ‘लॉर्ड्स’ पावला! शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आसामची फलंदाजी उद्ध्वस्त






