
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs South africa 3rd T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचे दोन सामने आतापर्यत खेळवण्यात आले आहेत पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली होती. तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या हाती निराशा लागली. दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये बरोबरी केली आहे. आता तिसरा सामना 14 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.
हा सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ शनिवारी दुपारी ३ वाजता धर्मशाला स्टेडियमवर सराव करेल. तथापि, दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे सराव वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. भारतीय संघ शुक्रवारी दुपारी १:४० वाजता गग्गल विमानतळावर पोहोचला. त्यानंतर कडक सुरक्षेत संघाला रस्त्याने कांडी येथील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुपारी ४:२० वाजता पोहोचला. भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांनी मागील काही सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे.
त्यामुळे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये ते कशी कामगिरी करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय संघ मुल्लानपूर (न्यू चंदीगड) मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिका दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका २०१५ मध्ये धर्मशाला येथे एक सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २०१९ मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. २०२० मध्येही सामना रद्द करण्यात आला.
Touchdown Dharamshala! ❄️#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2HMRdUNyxa — BCCI (@BCCI) December 12, 2025
आता, दोन्ही संघ दुसऱ्यांदा येथे एकमेकांसमोर येतील. मागील सामन्यामध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी त्याचबरोबर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे भारताच्या गोलंदाजीवर आणि फलंदाजीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. भारताच्या संघाने रन चेझ करताना विकेट लवकर गमवाले यामध्ये फक्त तिलक वर्मा याने अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यामध्ये भारताचा संघ बदल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सुर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजु सॅमसन, जितेश शर्मा, वाॅशिग्टंन सुंदर, अक्षर पेटल, अर्शदिप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा