Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 5th T20 : ‘गंभीर कोच नाही, संघाचा मॅनेजरच…’दिग्गज कपिल देव यांच्या विधानाने भारतीय क्रिकेट जगतात खळबळ 

दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावर टीका होत आहे. भारतीय माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी देखील गौतम गंभीरवर टीका केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 20, 2025 | 08:04 AM
IND vs SA 5th T20: 'He's not a coach, but the team's manager...' Veteran Kapil Dev's statement creates a stir in the Indian cricket world

IND vs SA 5th T20: 'He's not a coach, but the team's manager...' Veteran Kapil Dev's statement creates a stir in the Indian cricket world

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर कपिल देव यांची टीका
  • गंभीर कोच नसून संघाचा मॅनेजर होऊ शकतो, कपिल देव यांचे विधान
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभावाने भारतीय व्यवस्थापनावर टीका
IND vs SA 5th T20 : दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिकेत भारताला ० -२ असे पराभूत केले. हा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. खेळाडूंची सतत फेरबदलाची धोरणे आणि कामचलाऊ खेळाडूंना संधी देण्याच्या निर्णयांवर आधीच टीका सुरू असताना आता भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी परखड शब्दांत टीका केली असून, त्यांच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आता कपिल देव यांच्या विधानांनी चर्चेला नवे वळण दिले आहे.

हेही वाचा : IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये हार्दिक पंड्या बरसला! सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा युवराज सिंगनंतर दुसराच भारतीय

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) च्या शताब्दी चर्चासत्रात बोलताना कपिल देव म्हणाले की, आजच्या घडीला ‘कोच’ या शब्दाचा अर्थच बदलून गेला आहे. “कोच म्हणजे जो तुम्हाला शाळा किंवा कॉलेजच्या काळात खेळ शिकवतो, तंत्र विकसित करतो. माझ्यासाठी तेच खरे कोच आहेत. गौतम गंभीर लेगस्पिनर किंवा विकेटकिपरचा कोच कसा असू शकतो? तो कोच नसून संघाचा मॅनेजर होऊ शकतो,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

हेही वाचा : IND vs SA 5th t20I : हार्दिक पांड्याचा रोमॅंटिक अंदाज! अर्धशतक ठोकताच माहिका शर्माला दिला फ्लाइंग किस

पुढे बोलताना कपिल देव म्हणाले की, आधुनिक क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कोचिंगपेक्षा मॅन मॅनेजमेंटची अधिक आहे. मॅनेजर म्हणून तुम्ही खेळाडूंना प्रेरित करू शकता. युवा खेळाडू तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तेच सर्वात महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले. याच चर्चेत कपिल देव यांनी सुनील गावसकर यांच्याबाबतही मोठे विधान केले. जर सुनील गावस्कर आजच्या काळात खेळत असते, तर ते टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज ठरले असते. ज्यांचा डिफेन्स मजबूत असतो, त्यांना आक्रमक खेळ करणे सोपे जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारताचा टी-२० मालिकेवर कब्जा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर ५ बाद २३१ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघ २० षटकात २०१ धावाच करू शकला. परिणामी भारतीय संघाने हा सामना ३० धावांनी जिंकला आणि मालिका ३-१ अशी जिंकली.

Web Title: Ind vs sa 5th t20 legendary kapil dev criticizes indian coach gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 08:04 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Kapil Dev
  • Test Match

संबंधित बातम्या

Ashes 2025 : १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले! ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीने केला ‘हा’ भीम पराक्रम
1

Ashes 2025 : १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले! ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीने केला ‘हा’ भीम पराक्रम

IND vs SA 3rd T20 Playing 11 : गिलचा पत्ता कट, संजू इन…तिसऱ्या T20 साठी टीम इंडियाची प्लेइंग 11 अशी असू शकते!
2

IND vs SA 3rd T20 Playing 11 : गिलचा पत्ता कट, संजू इन…तिसऱ्या T20 साठी टीम इंडियाची प्लेइंग 11 अशी असू शकते!

IND vs SA : आज संजू सॅमसनला न्याय मिळणार का? शुभमन गिलमुळे टीम इंडियाला सहन करावा लागणार परिणार, संघात बदल होणार…
3

IND vs SA : आज संजू सॅमसनला न्याय मिळणार का? शुभमन गिलमुळे टीम इंडियाला सहन करावा लागणार परिणार, संघात बदल होणार…

IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात
4

IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.