अहमदाबादमध्ये हार्दिक पंड्याचे जलद अर्धशतक(फोटो-सोशल मीडिया)
Hardik Pandya’s fastest half-century : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर ५ बाद २३१ धावा उभ्या केल्या आहेत. या सामन्यात हार्दिक पंड्याने फक्त १६ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या आणि तो अर्धशतक पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला. सर्वात कमी अर्धशतकाचा विक्रम भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या नावावर आहे, ज्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध फक्त १२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.
हेही वाचा : IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला
हार्दिक पंड्या जेव्हा मैदानात आला तेव्हा त्याने आपल्या डावाची सुरुवातच एका षटकाराने करून आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर त्याने मागे वळून पहिले नाही. लिंडेने टाकलेल्या एका षटकात त्याने दोन चौकार आणि तेवढेच षटकार देखील ठोकले. १७ व्या षटकात षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पंड्याने १६ व्या चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत मोठी कामगिरी केली. यासह, तो अर्धशतक पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज देखील ठरला.
Outstanding show here from Tilak Varma & Hardik Pandya! 👊A power-packed 💯-run stand in just 41 balls! 💪 Updates ▶️ https://t.co/kw4LKLNSl3#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yL6upivyW7 — BCCI (@BCCI) December 19, 2025
हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी स्फोटक खेळी खेळली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात पाच बाद २३१ धावांचा डोंगर रचला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतीय संघाचा डाव सुरू केला आणि सहाव्या षटकात पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. यावेळी देखील कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट काहीच खास करू शकली नाही.७ धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्याने २५ चेंडूत ६३ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तर तिलक वर्माने ४२ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. यंदये त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला.
हेही वाचा : IND vs SA 5th t20I : अहमदाबाद हार्दिक-तिलकची विस्फोटक खेळी! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य






