
IND vs SA 3rd ODI: Quinton de Kock's storm shatters AB de Villiers-Gilchrist's records! Centuries in Visakhapatnam
Quinton de Kock creates record : विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद २७० धावा केल्या आहेत. या सामन्यात क्विंटन डी कॉकने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने शानदार शतक झळकवले आहे. या शतकासह, डी कॉकने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहे.
भारताने टॉस जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. रायन रिकेलटनला अर्शदीप सिंगने लवकर बाद केले. त्यानंतर डी कॉकने कर्णधार टेम्बा बावुमासोबत दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. ४८ धावा करून बावुमा बाद झाला. परंतु डी कॉक एक बाजू सांभाळत होता. त्याने ८९ चेंडूत १०६ धावा करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. या खेळत त्याने ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले आहेत.
भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम डी कॉकने आपल्या नावे केला आहे. ही कामगिरी करताना त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. डिव्हिलियर्सने सहा शतके केली आहेत, तर डी कॉकनच्या नावे आता सात शतके झळकवली आहेत. डी कॉक आता सनथ जयसूर्यासोबत बरोबरी साधली आहे. शिवाय, डी कॉकने एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याचा अॅडम गिलख्रिस्ट विक्रम मोडीत काढला आहे.
डी कॉकने परदेशी भूमीवर एकदिवसीय शतके करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. दोघांनीही आता प्रत्येकी सात शतके लगावलेली आहेत. या यादीत रोहित शर्मा आणि कुमार संगकारा सारख्या दिग्गज खेळाडूंचा देखील समावेश आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या एकदिवसीय मालिकेनंतर या दोन संघात पाच सामन्यांची टी20I मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी आधीच आपापले संघ जाहीर केले होते, परंतु मालिका सुरू होण्यापूर्वीच आफ्रिकन संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज क्वेना म्फाका आणि फलंदाज टोनी डी झोर्जी यांना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण टी 20I मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने झोर्जी तिसरा एकदिवसीय सामना देखील खेळू शकलेला नाही.