T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA T20I Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. आज या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या मालिकेनंतर या दोन संघात पाच सामन्यांची टी20I मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी आधीच आपापले संघ जाहीर केले होते, परंतु मालिका सुरू होण्यापूर्वीच आफ्रिकन संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. वेगवान गोलंदाज क्वेना म्फाका आणि फलंदाज टोनी डी झोर्जी यांना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण टी 20I मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने झोर्जी तिसरा एकदिवसीय सामना देखील खेळू शकलेला नाही.
टोनी डी झोर्जीला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला ४५ व्या षटकात १७ धावा काढून रिटायर हर्ट करावे लागले होते. तो सध्या तंदरुस्त नाही. त्यामुळे आता त्याला घरी पाठवण्यात येणार आहे. त्याच्या जागी कोणाला खेळवायचे याचा निर्णय करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे, वेगवान गोलंदाज क्वेना म्फाका देखील डाव्या हाताच्या दुखापतीने ग्रासला आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकेने तो संपूर्ण टी-२० मालिकेतून बाहेर पडला असल्याची पुष्टी केली असून त्याच्या जागी लुथो सिपामला संघात स्थान देण्यात आले आहे.
आतापर्यंत, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने यापैकी १८ सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेला केवळ १२ वसामन्यातच विजय मिळवता आलेला आहे.या आकडेवारीवरून स्पष्ट होते की टी-२० स्वरूपात भारतीय संघाचा वरचष्मा आहे आणि भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता, ही मालिका रोमांचक होणार आहे.
पूर्ण टी२० मालिका वेळापत्रक
हेही वाचा : IND vs SA 3rd ODI : दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य; डी कॉकचे शानदार शतक
एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रुइस, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, अँरिच नॉर्टजे, लुथो सिपामला, ट्रिस्टन स्टब्स.






