
India vs South africa Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने फारच निराशाजनक फलंदाजी केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात खराब कामगिरीमुळे सामना गमवावा लागला होता तर त्यानंतर या सामन्यात देखील भारतीय संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. भारताच्या संघाने सुरुवात चांगली केली पण पहिल्या विकेटनंतर भारताच्या संघाचा डाऊनफाॅल सुरु झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांसमोर भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. एका वेळी टीम इंडियाचा स्कोअर १ विकेटच्या मोबदल्यात ९५ धावा होता, पण नंतर विकेटचा इतका गोंधळ उडाला की भारताचा स्कोअर अचानक ५ विकेटच्या मोबदल्यात १०५ धावांवर पोहोचला. यादरम्यान, टीम इंडियाने यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांच्या रूपात चार विकेट गमावल्या. भारताला पहिला धक्का केएल राहुलच्या रूपात ६५ धावांवर बसला. आतापर्यंत मार्को जानसेन आणि सायमन हार्मर यांनी २-२ विकेट घेतल्या आहेत, तर केशव महाराज यांना १ यश मिळाले आहे.
That’s four for Marco Jansen! 👏👏 India lose another with the third wicket in the second session. It’s 122/7 now after 43.3 overs. 🏏 — Proteas Men (@ProteasMenCSA) November 24, 2025
टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. १०२ धावांवर भारताचा चौथा फलंदाजही पॅव्हेलियनमध्ये परतला तर त्यानंतर लगेचच ध्रुव जुरेल खाते न उघडताच बाद झाला आहे. भारताचा सहावा पराभव नितीश कुमार रेड्डी यांच्या रूपात झाला, जो १० धावा करुन बाद झाला. टीम इंडियाने ही विकेट ११९ धावांवर गमावली. टीम इंडिया ऑलआउटकडे वाटचाल करत आहे. रवींद्र जडेजा देखील ६ धावांवर बाद झाला आहे. यासह भारताने ७ विकेट गमावून १२२ धावा केल्या आहेत. टीम इंडियाने १०५ धावांवर पाचवी विकेट गमावली. ७ धावा केल्यानंतर ऋषभ पंतने त्याची विकेट गमावली.
भारताच्या संघाने सुरु असलेल्या या मालिकेच्या दोन्ही सामन्यांमध्ये फारच निराशाजनक फलंदाजी केली आहे. यावर मागील काही महिन्यांपासून सातत्याने संघाची कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे.