
IND vs SA: 'He will never score a century...' Was Sunil Gavaskar a dwarf on Virat Kohli's second consecutive century?
Sunil Gavaskar’s commentary on Virat Kohli’s century : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या एकदिसीय सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सलग दोन शतके ठोकली आहेत. विराट कोहलीच्या शतकावर आता माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी भाष्य केले आहे. त्यांचा असा विश्वास होता की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या सुरुवातीपासूनच विराट कोहली शतक करेल असे अपेक्षा होती.
विराट कोहली महान फलंदाजाने षटकार मारून खाते उघडले आणि मागील सामन्यापासून आत्मविश्वास कायम ठेवला. विराट कोहलीने बुधवारी ९३ चेंडूत १०२ धावा केल्या. यामध्ये त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले होते. एकदिवसीय स्वरूपात विराटचे ५३ वे शतक ठरले आहे. तसेच त्याचे हे सर्व फॉरमॅटमधील ८४ वे शतक आहे. तथापि, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना चार विकेट्सने गमावला. ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने १२० चेंडूत १३५ धावा फटकावल्या होत्या. ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय मिळवला होता.
सुनील गावस्कर म्हणाले की, “खरं सांगायचं तर, तो शतक करणार नाही असं कधीच वाटलंच नव्हतं. पहिल्याच चेंडूपासून तो त्याच्या रांचीच्या डावावर भर देत असल्याचं दिसून येत होतं. कोहलीने षटकार मारून सुरुवात केली, खर तर तो असा शॉट जो तो सहसा खेळताना दिसत नाही. त्यातून त्याचा आत्मविश्वास दिसून आला. तेव्हापासून असं वाटलं की तो शतक करू शकणार आहे.” विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड (८३ चेंडूत १०५ धावा) यांनी १९५ धावांची खेळी करून भारताची एकदिवसीय सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम रचला होता.
सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, “ऋतुराजसोबत त्याची भागीदारी शानदार होती. ऋतुराज गायकवाडने ज्या पहिल्या चेंडूवर सामना केला तो जॅनसेनचा बाउन्सर होता, जो त्याने जयस्वालला बाद केल्यानंतर लगेच वापरला. तो चौकार मारण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर कोहली त्याचे मनोबल वाढवण्यासाठी त्याच्याकडे पोहचला. त्यानंतर ऋतुराजने पूर्ण आत्मविश्वासाने फलंदाजीचे प्रदर्शन केले.”
हेही वाचा : IND vs SA, 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये भारताची पाटी कोरी! गेल्या सहा वर्षापासून विजयापासून दूर; वाचा सविस्तर