
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs South africa T20 Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या भारताच्या संघाच्या खराब कामगिरीमुळे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात टीम इंडियाला ट्रोल केले जात आहे. 2026 विश्वचषकमध्ये भारताच्या संघासाठी सुर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर अनेक युवा खेळाडू त्याचा पहिला विश्वचषक रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांच्या निवृतीनंतर खेळताना दिसणार आहेत. भारताच्या संघाने 2024 मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर टी20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.
2026 विश्वचषक हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. भारताचे सर्व सामने हे भारतात होणार आहेत तर पाकिस्तानविरुद्ध सामना हा श्रीलंकेमध्ये खेळवला जाणार आहे. त्याआधी भारताचा संघ हा दोन मालिका खेळणार आहे. सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर भारताच्या संघाची टी20 मालिका देखील खेळवली जाणार आहे. ही मालिका पाच सामन्यांची असणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध देखील मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही मालिका भारताच्या संघासाठी महत्वाच्या असणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या संघाने खराब कामगिरी केली आहे त्यामुळे टी20 संघाकडून टीम इंडियाची जास्त अपेक्षा आहेत. या मालिकेमध्ये हार्दिक पांड्याचे संघामध्ये पुनरागमन होणार आहे. आशिया कप फायनलच्या सामन्यामध्ये झालेल्या दुखापतीनंतर आता तो संघामध्ये कमबॅक करणार आहे. या मालिकेमध्ये रिंकू सिंह याला संघामधून वगळण्यात आले आहे.
| क्रमांक | सामना | ठिकाण | वेळ |
|---|---|---|---|
| 1 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – पहिला सामना | बारबती स्टेडियम, ओडिसा | 7.00 |
| 2 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – दुसरा सामना | न्यू पीसीए स्टेडियम, चंडीगढ | 7.00 |
| 3 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – तिसरा सामना | हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम | 7.00 |
| 4 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – चौथा सामना | एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ | 7.00 |
| 5 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – पाचवा सामना | नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद | 7.00 |
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर
🚨 NEWS 🚨#TeamIndia‘s squad for the 5⃣-match T20I series against South Africa announced. Details ▶️ https://t.co/3Bscuq6Gri #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0bHLCcbwTD — BCCI (@BCCI) December 3, 2025