Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA, T20 World Cup : ‘तो ज्या संघांचा सामना करेल त्यांची काळजी..’ अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मबद्दल कॅप्टन सूर्याचे विधान

टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ सामन्यांची सुरुवात झाली आहे. सुपर ८ मध्ये २२ फेब्रुवारी रोजी भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. दरम्यान, कर्णधार सूर्याने अभिषेक शर्माच्या फॉर्मवर भाष्य केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 21, 2026 | 08:06 PM
IND vs SA, T20 World Cup: 'Worried about the teams he will face..' Captain Surya's statement on Abhishek Sharma's poor form

IND vs SA, T20 World Cup: 'Worried about the teams he will face..' Captain Surya's statement on Abhishek Sharma's poor form

Follow Us
Close
Follow Us:

Suryakumar Yadav’s commentary on Abhishek Sharma : टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ सामन्यांची सुरुवात झाली आहे. पहिला सुपर ८ सामना आज कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दूसरा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी, २२ फेब्रुवारी  रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत आहे. केवळ, संघाला अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी आहे. सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्मवर कर्णधार सूर्यकुमार यादवने भाष्य केले आहे.

हेही वाचा : IND vs SA, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये कोण ठरणार बॉस? फलंदाज की गोलंदाज? वाचा खेळपट्टीचा अहवाल

भारतासाठी सलामी अजूनही चिंतेचा विषय

भारतीय संघाने ग्रुप (टी२० विश्वचषक २०२६ ) स्टेजमध्ये शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमधील खेळाडूंनी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली आहे. तथापि, सलामीच्या स्लॉटमध्ये अभिषेक शर्मा लागोपाठ तीन सामन्यात शून्य बाद होणे चर्चेचा विषय बनला आहे. तो या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहे आणि आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये त्याला खातेही उघडता आले नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात देखील तो एकही धाव न करता परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसून येत होती.

सूर्यकुमार यादवचे अभिषेक शर्मावर भाष्य

सुपर ८ सामन्याच्या एक दिवस आधी, कर्णधार सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत अभिषेकच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आले. तेव्हा सूर्याने आत्मविश्वासाने उत्तर दिले. अभिषेकबद्दल काळजी करणाऱ्यांबद्दल त्यांना काळजी वाटते असे सूर्या म्हणाला. खरी चिंता पुढील सामना होणाऱ्या संघांबद्दल असायला पाहिजे. सूर्या असा देखील म्हणाला की, अभिषेकने गेल्या वर्षी शानदार कामगिरी बजावली होती आणि आता त्याला पाठिंबा देण्याची जबाबदारी संघाची आहे. कर्णधाराच्या विधानावरून स्पष्ट होते की संघ व्यवस्थापन या तरुण फलंदाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची शर्माची आकडेवारी

अभिषेक शर्माच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय विक्रमाबद्दल सांगायचे झाले तर त्याने या संघाविरुद्ध ८ सामन्यात २५ च्या सरासरीने २०० धावा फटकावल्या आहेत. त्याच्या नावावर एक अर्धशतक देखील जमा आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट १७३.९१ आहे, जो त्याची आक्रमक शैलीचे दर्शन घडवतो.

हेही वाचा : IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन

दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे

भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, इशान किशन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघ: एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, डेवाल्ड ब्रुविस, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना म्फाका, लुंगी एनगिडी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, अँरिच नॉर्टजे, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन.

Web Title: Ind vs sa t20 world cup captain suryakumar yadavs big statement on abhishek sharmas poor form

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ind Vs Sa
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IPL 2026 : SRH च्या विजयानंतरही Abhishek Sharma ला मोठा झटका! BCCI ची मोठी कारवाई
1

IPL 2026 : SRH च्या विजयानंतरही Abhishek Sharma ला मोठा झटका! BCCI ची मोठी कारवाई

KKR Vs SRH Live: घरच्या मैदानावर ‘केकेआर’चा ‘गेम ओव्हर’; ‘एसआरएच’ने 65 धावांनी केले चारीमुंड्या चीत
2

KKR Vs SRH Live: घरच्या मैदानावर ‘केकेआर’चा ‘गेम ओव्हर’; ‘एसआरएच’ने 65 धावांनी केले चारीमुंड्या चीत

SRH च्या हेड-शर्माने पिसं काढली! पहिल्या विजयासाठी KKR ला ‘अजिंक्य’ खेळीची गरज, 227 धावांचे लक्ष्य
3

SRH च्या हेड-शर्माने पिसं काढली! पहिल्या विजयासाठी KKR ला ‘अजिंक्य’ खेळीची गरज, 227 धावांचे लक्ष्य

KKR चे ‘नारायणास्त्र’ चालणार की SRH चे ओपनर्स धुलाई करणार? काय आहे आजची Playing 11
4

KKR चे ‘नारायणास्त्र’ चालणार की SRH चे ओपनर्स धुलाई करणार? काय आहे आजची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.