अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Sharma’s statement about his batting : टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने साखळी सामन्यात शानदार कामगिरी करत सुपर ८ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील सुपर ८ सामान्यांना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. तसेच, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चा सुपर ८ सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या प्रभावी कामगिरी करत आहे. परंतु, सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. या स्पर्धेत अभिषेक शर्मा आपले खाते उघडू शकला नाही. त्याच्या फॉर्मबद्दल अभिषेक शर्माने भाष्य केले आहे.
स्टार स्पोर्ट्सकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक शर्मा खूप आत्मविश्वास पूर्ण दिसत आहे. यावेळी त्याने स्पष्ट केले आहे की त्याची बॅट आगामी सामन्यांमध्ये कामगिरी करेल. अभिषेक शर्मा म्हणाला की, “मी माझी प्रक्रिया आणि मानसिकता कधीही बदलणार नाही.” या विधानावरून आता हे स्पष्ट होते की अभिषेक शर्माला आगामी जेव्हा तो मैदानावर उतरेल तेव्हा त्याला त्याच्या कामगिरीवर विश्वास आहे.
अभिषेक शर्मा पुढे म्हणाला की , “मला माझी फलंदाजी खूप आवडते. मी दोन वर्षांपूर्वी दबाव स्वीकारणे थांबवले आहे , कारण मला वाटते की माझ्याकडे फक्त सराव आणि प्रशिक्षण ही एकच प्रक्रिया आहे, जी मला नेहमीच करावी लागत असून ती वेळेनुसार वाढत जाईल. मला ते आवडते. म्हणून, कोणताही दबाव नसतो आणि एक फलंदाज म्हणून, प्रत्येकाचा फॉर्म चढ-उतार होत असतो. परंतु कधीतरी मला असेच खेळावे लागणार आहे, असे वाटते आणि मी यामध्ये कोणतेही बदल करणार नाही.”
२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी अभिषेक शर्माला या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून पाहिले जात होते, परंतु वैयक्तिकरित्या, टी-२० विश्वचषक त्याच्यासाठी आतापर्यंत खूप वाईट राहिला आहे. अभिषेकने अद्याप विश्वचषकात एक देखील धाव काढली नाही. तो लागोपाठ तीन डावात भोपळा ना फोडता माघारी गेला. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्या फॉर्मबबद्दल चिंता भासू लागली आहे.






