फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये काल मालिकेचा शेवटचा सामना झाला. यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत १३५ धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर ही मालिका ३-१ असा विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केल. भारताच्या संघाने सलग तिसऱ्या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे. विश्वचषक २०२४ नंतर भारत झिम्बाब्वे दौऱ्यावर होता यामध्ये टीम इंडियाने संघाला त्याच्या घराच्या मैदानावर पराभूत केलं होते. त्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर असताना टीम इंडियाने कमालीची कामगिरी करत मालिका एकतर्फी जिंकली होती. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामन्यांची मालिका झाली यामध्ये भारताच्या संघाने विजयी सलामी दिली. पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तिसरा सामना भारताच्या संघाने ११ धावांनी जिंकला. भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २८३ धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु एवढे मोठे लक्ष्य उभे केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ डगमगला आणि ३ ओव्हरमध्ये संघाने चार विकेट्स गमावले आणि शेवटच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने १३२ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये भारताच्या फलंदाजांची अनेक कॅच सोडले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील मालिकेच्या शेवटच्या आणि चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पाहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भारताच्या संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने कमालीची सुरुवात केली आणि विस्फोटक फलंदाजी करायला सुरुवात केली. अभिषेक शर्माने संघासाठी १८ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. त्यानंतर मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताची रन मशीन मैदानात आली आणि धावांचा पाऊस झाला. भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने मागील दोन महिन्यांमधील त्याचे तिसरे शतक झळकावले. संजूने फक्त ५६ चेंडूमध्ये १०६ धावा केल्या, तर त्याचा पार्टनर टिळक वर्माने त्याच्या सलग दुसऱ्या सामन्यात भारतासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. टिळक वर्माने संघासाठी फक्त ४७ चेंडूमध्ये १२० धावा केल्या आणि संघासाठी सर्वात मोठी धावसंख्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभी केली.
A 135-run victory in Johannesburg! #TeamIndia seal the T20I series 3⃣-1⃣ 👏👏
Ramandeep Singh with the final wicket as South Africa are all out for 148.
Scorecard – https://t.co/b22K7t9imj#SAvIND pic.twitter.com/AF0i08T99Y
— BCCI (@BCCI) November 15, 2024
भारतीय गोलदाजांबद्दल बोलायचं झालं तर अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हेंद्रिकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुसऱ्या ओव्हरमध्ये भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने रायन रिकेल्टन त्याचा बळी बनवले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंहने संघासाठी तीन विकेट्स घेतले. हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंह या दोघांच्या हाती प्रत्येकी एक विकेट लागला. वरून चक्रवर्तीने संघासाठी दोन विकेट्स नावावर केले. अक्षर पटेलने संघासाठी दोन विकेट्स घेतले. तर रवी बिश्नोई ने संघासाठी १ विकेट घेतला.