फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहित शर्मा : भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. यासाठी बीसीसीआयने १८ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. पण पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा संघामध्ये नसणार असे सांगण्यात आले होते. रोहित शर्माची पत्नी रीतिका प्रेग्नेंट असल्यामुळे रोहित शर्मा आणि त्याची पत्नी लवकरच आई बाबा होणार अशी वृत समोर आले आहेत. रोहित शर्मा अजून मुंबईतच आहे आणि आता त्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन झाले आहे अशी माहिती समोर आली आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने मुलाला जन्म दिला आहे. या कारणामुळे रोहित अद्याप ऑस्ट्रेलियाला गेला नाही. यासंदर्भात रोहित शर्मा आणि त्याच्या पत्नीने अधिकृत माहिती दिलेली नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर रोहित आणि रितिका हे दोघे दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. याआधी दोघांना एक मुलगीही होती. ज्याचे नाव समायरा. रोहित शर्माबद्दल आधीच बातम्या आल्या होत्या की तो अजून ऑस्ट्रेलियाला का पोहोचला नाही.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये सराव करत आहे. तर दुसरीकडे असे सांगण्यात येत आहे की, रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे भारताच्या संघाचे कर्णधार पद हे जसप्रीत बुमराकडे सोपवण्यात आले आहे. 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शुभारंभ होणार आहे. बॉर्डर गावास्कर ट्रॉफी सहा दिवसाआधी रोहित शर्माच्या मुलाने जन्म दिला म्हणून कदाचित तो पहिल्या सामन्यात उपस्थित राहू शकतो. परंतु अजूनपर्यंत या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लवकरच रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भारताच्या संघाने T20 विश्वचषक 2024 रोहित शर्माचे नेतृत्वखाली जिंकला आणि जगभरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.भारताचा कर्णधार रोहित शर्माची गणना ही दिग्गज कर्णधारांमध्ये केली जाते. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया हा क्रिकेट विश्वामध्ये एक बलाढ्य देश आहे त्यामुळे भारतासाठी त्यांना पराभूत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाला पाच कसोटी सामन्यातून चार कसोटी सामने जिंकणं गरजेचं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत विजय मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. भारताच्या संघाला न्यूझीलंड विरुद्ध निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या आणि गौतम गंभीरच्या कोचिंगवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
असं म्हटलं जात आहे की पहिल्या कसोटी सामना रोहित शर्मा खेळणार नाही परंतु दुसरीकडे भारताचा संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी जोरदार सराव करत आहे. सोशल मीडियावर अनेक वृत्त समोर आले आहेत की सरावाच्या दरम्यान भारताचे काही खेळाडू हे जखमी झाले आहेत. त्यामुळे याचा धक्का भारताच्या संघाला नक्कीच बसणार आहे त्याचबरोबर मोठे नुकसान देखील होऊ शकते. रोहित शर्मा संघामध्ये आल्यानंतर भारतीय संघासमोर मोठे दडपण असणार नाही. असं म्हटले जात होते की सरफराज खान आणि केएल राहुल हे जखमी झाले होते.