
IND vs SL W 5th T20I: India sweeps Sri Lanka! Kaur's army achieves a clean sweep with a 5-0 victory in the five-match T20 series.
India defeated Sri Lanka by 15 runs : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना १५ धावांनी जिंकत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेला ते पूर्ण करता आले नाही. त्यांना २० षटकांत ७ बाद १६० धावा करता आल्या. परिणामी भारताने श्रीलंकेचा 15 धावंणि पराभव केला आणि मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले.
हेही वाचा : टी-२० विश्वचषकासाठी ओमानचा संघ जाहीर! जतिंदर सिंगच्या हातात संघाची धुरा; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध मालिकेतील सुरूवातीचे चार सामने जिंकत मालिका डा विजय मिळवला आहे. संपूर्ण मालिकेत र भारताने वर्चस्व गाजवत सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवले आहेत. अखेरच्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक से जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रीग्जच्या अनुपस्थितीत भारताला , सुरूवातीला एकामागून एक धक्के बसले.
हेही वाचा :World Blitz Championship: एरिगेसीची कार्लसनवर मात! अर्जुनने पहिल्या दिवशी घेतली संयुक्त आघाडी
भारताची अवस्था ५ बाद ७७ झाली होती. पण, कर्णधार हरमनप्रीत कौरने अमनज्योत कौरच्या साथीने भारताचा डाव सावरला. हरमनप्रीतने ६८ धावा केल्या. तर अमनज्योतने २१ आणि अरुंधती रेड्डीने २७धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताचा १७५ हा सन्मानजनक आकडा गाठता आला. श्रीलंकेची सुरूवात चांगली राहिली. कर्णधार अटापट्ट २ धावांवर बाद झाल्यानंतर हसिनी परेरा आणि इमेशा दुलानी यांनी श्रीलंकेचे आव्हान जिवंत ठेवले. पण, या दोघी बाद झाल्यावर श्रीलंकेचा डाव कोसळला. त्यांचे एका मागून एक फलंदाज बाद होत गेले. भारताकडून दीप्ती शर्माने १ विकेट मिळवत महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी जगातील पहिली गोलंदाजी होण्याचा मान पटकावला. दीप्ती शर्माने १५२ विकेट्स घेत हा इतिहास घडवला आहे.
भारत: शफाली वर्मा, जी कमलिनी, रिचा घोष (डब्ल्यू), हरमनप्रीत कौर (क), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, श्री चरणी
श्रीलंका : हसिनी परेरा, चामारी अथापथु (क), इमेशा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षिका सिल्वा, रश्मिका सेवावंडी, कौशली नुथ्यांगना (डब्ल्यू), निमाशा मधुशानी, इनोका रणवीरा, मलकी मदरा