
IND VS SL W 5th T20I: India sets a target of 176 runs for Sri Lanka to win! Harmanpreet Kaur scores a brilliant half-century.
IND VS SL W 5th T20I : भारत आणि श्रीलंका महिला संघात आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर 7 बाद 175 धावा उभ्या केल्या. श्रीलंका संघाला विजयासाठी 176 धावा कराव्या लागणार आहेत. श्रीलंकेकडून कविशा दिलहरीने 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : टी-२० विश्वचषकासाठी ओमानचा संघ जाहीर! जतिंदर सिंगच्या हातात संघाची धुरा; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना, भारताने 20 षटकांत 175 धावा उभ्या केल्या. ज्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 5 धावांवरच आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर एकामागून एक विकेट जात राहिल्या. 77 धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाच्या डावाची सूत्रे हातात घेतली. हरमनप्रीत कौरने 43 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये तिने 9 चौकार आणि एक षटकार मारला.
तसेच दुसऱ्या टोकाला अमनजोत कौरने तिला चांगली साथ दिली. अमनजोत कौरने 18 चेंडूत 21 धावा केल्या. यामध्ये तिने 1 षटकार आणि 1 चौकार लागवला. त्यानंतर आलेल्या अरुंधती रेड्डीने 11 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी केली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्मृती मानधनाला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे, तिच्या जागी जी. कमलिनीला संघात स्थान देण्यात आले.
हेही वाचा : WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘ही’ स्टार खेळाडू सामील! तर RCB ला मोठा झटका; अष्टपैलू एलिस पेरीची माघार
Innings Break! A brilliant fightback led by captain Harmanpreet Kaur guides #TeamIndia to 1⃣7⃣5⃣/7 👏 Over to our bowlers as we aim for a series sweep 👌 Scorecard ▶️ https://t.co/E8eUdWSj7U#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/cmlWDyPriM — BCCI Women (@BCCIWomen) December 30, 2025
भारत: शफाली वर्मा, जी कमलिनी, रिचा घोष (डब्ल्यू), हरमनप्रीत कौर (क), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, श्री चरणी
श्रीलंका : हसिनी परेरा, चामारी अथापथु (क), इमेशा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षिका सिल्वा, रश्मिका सेवावंडी, कौशली नुथ्यांगना (डब्ल्यू), निमाशा मधुशानी, इनोका रणवीरा, मलकी मदरा
बातमी आपडेट होत आहे….