
Deepti sharma became world's No. 1 T20I bowler
दीप्ती शर्माने थायलंडविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. आपल्या १५० व्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने सात चेंडूंमध्ये तीन विकेट्स घेतले. विशेष म्हणजे, दीप्तीने एकही धाव दिली नाही. या तीन विकेट्ससह तिने एक विश्वविक्रमही प्रस्थापित केला आहे. ती आता महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली आहे. तसेच, टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही धाव न देता तीन किंवा अधिक विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिप्तीने थिपाचा पुथावोंगला मागे टाकले आहे.दीप्ती शर्माने १५० सामन्यांमध्ये १७१ विकेट्स घेतले असून ती या यादीत अव्वल स्थानी आहे. थायलंडची थिपाचा पुथावोंग दुसऱ्या स्थानावर आहे. तिने आतापर्यंत १०९ सामन्यांमध्ये १७० विकेट्स घेतले आहेत. रवांडाची हेन्रिएट इशिम्वे १३४ सामन्यांमध्ये १६४ विकेट्ससह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोनने आतापर्यंत ११३ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५४ विकेट्स घेतले असून ती चौथ्या स्थानावर आहे. दीप्तीने आपल्या कामगिरीने सातत्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीच्या जोरावर अनेक वेळा आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.
🚨 HISTORY BY DEEPTI SHARMA 🇮🇳 – Deepti Sharma becomes the leading wicket taker in Women’s T20I history. One of the Greats in International cricket. pic.twitter.com/GIqeavUqmS — Johns. (@CricCrazyJohns) August 30, 2026
भारतीय महिला संघ आणि थायलंड महिला संघ यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात,भारतीय संघाने ९४ धावांनी मोठा विजय नोंदवला. भारतीय संघाने आशिया कपमधील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, थायलंड महिला संघ १६.१ षटकांत ६५ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात शफाली वर्माने ३६ चेंडूंमध्ये ६४ धावांची खेळी केली आणि यासाठी तिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.