IND beat THA by 94 runs
डावाची सुरुवात करताना स्मृती मंधानाने १० चेंडूंमध्ये १९ धावा केल्या. मात्र, ती सामन्यात रन आऊट झाली. यानंतर शेफाली वर्माने सूत्रे हाती घेतली. तिने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ३६ चेंडूंमध्ये नाबाद ६४ धावा केल्या. प्रतीका रावल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिने या सामन्यात टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रतीकाला तिच्या पदार्पणाच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आणि ती १८ चेंडूंमध्ये केवळ २२ धावा करू शकली.कर्णधार हरमनप्रीत कौरनेही ९ चेंडूंमध्ये ५ धावा करून निराशा केली. यानंतर भारतीय संघाची फंलदाजी पूर्णपणे कोसळली. भारती फूलमालीने १४ चेंडूंमध्ये १३ धावांचे योगदान दिले. रिचा घोष ०, दीप्ती शर्मा ५ आणि प्रेमा रावत ६ धावांवर बाद झाल्या. भारतासाठी क्रांती गौरने ८ चेंडूंमध्ये नाबाद १५ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २० षटकांत १५९/९ पर्यंत पोहोचवली. थायलंडकडून सुलीपोर्न लाओमीने तीन विकेट्स, तर सुनिदा चतुरोंगरतानाने दोन विकेट्स घेतले, तर थिपाचा पुत्थावोंग आणि चनिदा सुत्तिरुआंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
India have started the #AsiaCup campaign with a big 94-run victory over Thailand. Details – https://t.co/Tgf2CJnHta #INDvTHAI pic.twitter.com/5NS69LKTVh — BCCI Women (@BCCIWomen) August 30, 2026
१६० धावांचे लक्ष्य गाठताना थायलंडचा संघ १६.१ षटकांत ६५ धावांवर सर्वबाद झाला. थायलंडकडून नन्नपत कोनचारोएनकाईने ४८ चेंडूंमध्ये ४१ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही. सलामीवीर नट्टाकन चंथम आणि फन्निता माया यांनी अनुक्रमे ४ आणि ६ धावा केल्या. अफिसारा सुवानचोनरथीने १ आणि चनिदा सुथिरुआंगने ५ धावा जोडल्या. भारताने हा सामना ९४ धावांनी जिंकला. भारतासाठी नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. दीप्ती महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाजही ठरली.






