
IND vs WI 5th T20 Bengaluru
आतापर्यंत मालिकेत चार सामने खेळले गेले असून दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे, हा सामना मालिकेतील निर्णायक सामना असेल. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चारही सामन्यांमध्ये फलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे.त्यांनी २५० धावांचे लक्ष्यही यशस्वीपणे पूर्ण केले गेले आहे. त्यामुळे, बंगळूरुमध्ये हवामान आणि खेळपट्टीची भूमिका महत्वाची असेल. (IND vs WI 5th T20 Bengaluru Match Delayed Due to rain)
भारतीय संघ दोन वर्षांच्या कालावधीनंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. येथील खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. कारण, गोलंदाजांना स्टेडियमच्या लहान बाउंड्री लाइन्समुळे गोलंदाजांना गोलंदाजी करणे तितके सोपे असणार नाही. परंतु, हवामानामुळे खेळपट्टी ओलसर असेल, ज्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.
याउलट फलंदाजांना जलद धावा करणे कठीण होईल. येथे खेळल्या गेलेल्या १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने चार वेळा, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे, आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा टी२० सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर विविध भाषांमध्ये सामन्याच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवरही सामन्याचे थेट स्ट्रीमिंग पाहू शकता. याव्यतिरिक्त, डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर.
वेस्ट इंडिजचा संघ: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमार जोसेफ, अमीर जांगू, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.