Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI : वेस्ट इंडिजच्या संघाला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी प्रमुख वेगवान गोलंदाज झाला जखमी

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज शमार जोसेफ दुखापतीमुळे आगामी मालिकेतून बाहेर पडला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने सोशल मीडिया पोस्टमध्ये ही बातमी जाहीर केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 26, 2025 | 02:19 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारताचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सायकलच्या दुसऱ्या मालिकेसाठी सज्ज आहे. इंग्लडविरुद्ध मालिकेनंतर भारताचा संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळणार आहे. ही मालिका भारतामध्येच होणार आहे. भारताचा यूवा आणि अनुभवी खेळाडूंचा हा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायला तयार आहे. आशिया कप 2025 नंतर भारताचा संघ ही मालिका खेळणार आहे.  

दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज शमार जोसेफ दुखापतीमुळे आगामी मालिकेतून बाहेर पडला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने सोशल मीडिया पोस्टमध्ये ही बातमी जाहीर केली. शमारला दुखापत कशामुळे झाली हे माहित नाही.

IND vs SL Asia Cup 2025 : संजू सॅमसनसह हे 3 खेळाडू आज बाहेर राहणार…अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग 11

जोसेफची जागा या घेतली अष्टपैलू खेळाडूने 

२२ वर्षीय जोहान लायनला शमार जोसेफच्या जागी वेस्ट इंडिज संघात स्थान देण्यात आले आहे. बार्बाडोसच्या या अष्टपैलू खेळाडूने त्याच्या कारकिर्दीत १९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ३२ डावांमध्ये ४९५ धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. जोहान लायनने त्याच्या गोलंदाजीने सर्वाधिक प्रभावित केले. त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत २२.२८ च्या सरासरीने ६६ बळी घेतले. त्याने चार वेळा एका डावात पाच बळी घेतले आहेत.

Squad Update 🚨 Johann Layne has replaced Shamar Joseph in the squad for the test series against India. Joseph has been ruled out due to an injury and will be re-evaluated ahead of the Bangladesh limited overs series.#INDvsWI | #MenInMaroon pic.twitter.com/2z5uiZSicu — Windies Cricket (@windiescricket) September 26, 2025

जोसेफ कधी परत येईल?

शमार जोसेफ लवकरच परततील अशी अपेक्षा आहे. बांगलादेशविरुद्धच्या व्हाईट बॉल मालिकेसाठी तो तंदुरुस्त असेल. वेस्ट इंडिज १८ ऑक्टोबरपासून बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

भारत-वेस्ट इंडिज वेळापत्रक

वेस्ट इंडिज संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. पहिली कसोटी २ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होईल. त्यानंतर दोन्ही संघ १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुसऱ्या कसोटी सामन्यात आमनेसामने येतील.

वेस्ट इंडिजचा अद्ययावत संघ :

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन, केवलन अँडरसन, अ‍ॅलिक एथान्जे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप, टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, जोहान लायन, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पियरे आणि जेडेन सील्स.

Web Title: Ind vs wi big blow to west indies team leading fast bowler injured before test series against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • cricket
  • Ind vs WI
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs SL Asia Cup 2025 :  संजू सॅमसनसह हे 3 खेळाडू आज बाहेर राहणार…अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग 11
1

IND vs SL Asia Cup 2025 : संजू सॅमसनसह हे 3 खेळाडू आज बाहेर राहणार…अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग 11

India A vs Australia A : वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी कांगारू गोलंदाजांना KL Rahul ने धु धु धुतलं…केला धमाका ठोकलं शतक!
2

India A vs Australia A : वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी कांगारू गोलंदाजांना KL Rahul ने धु धु धुतलं…केला धमाका ठोकलं शतक!

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi ने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केला पराक्रम! वेदांत त्रिवेदीने केला कहर
3

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi ने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केला पराक्रम! वेदांत त्रिवेदीने केला कहर

IND vs SL Preview : शेवटचा सराव सामना खेळणार आज टीम इंडिया! सुपर-4 सामन्यात होणार श्रीलंकेशी सामना, वाचा सविस्तर
4

IND vs SL Preview : शेवटचा सराव सामना खेळणार आज टीम इंडिया! सुपर-4 सामन्यात होणार श्रीलंकेशी सामना, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.