फोटो सौजन्य - बीसीसीआय
India vs West Indies 1st Test 1st Session : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिल्या सेशनमध्ये कमालीची कामगिरी केली. या सामन्यात वेस्टइंडीजचा कर्णधार रोस्टन चेस याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिके नंतर भारताचा संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या दुसऱ्या मालिकेकडे वळला आहे. भारताच्या संघासाठी ही मालिका देखील फार महत्वाची असणार आहे.
पहिल्या सेशनमध्ये भारताच्या संघाने पाच विकेट्स घेऊन सामन्यावर मजबूत पकड केली आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने पहिल्या सेशनमध्ये सुरू असलेल्या सामन्या पाच विकेट्स नावावर केले आहेत. यामध्ये मोहम्मद सिराज यांच्या नावावर तीन विकेट्स आहेत तर जसप्रीत बुमराहने देखील एक विकेट नावावर केला आहे. तर कुलदीप यादवने देखील संघाला एक विकेट मिळवून दिला आहे.
That’ll be Lunch on Day 1 of the 1st Test. A fine morning session for #TeamIndia bowlers as Siraj picks up three wickets; Bumrah and Kuldeep get a wicket apiece. West Indies 90/5 Scorecard – https://t.co/Dhl7RtjvWY #INDvWI #1stTEST #TeamIndia @IDFCfirstbank pic.twitter.com/LGbGg0YMzV — BCCI (@BCCI) October 2, 2025
वेस्टइंडीजचे फलंदाज या सामन्यात पहिल्या सेशनमध्ये फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही. पहिल्या सेशननंतर वेस्टइंडीजचे संघाने पाच विकेट्स कमावून 90 धावा केल्या आहेत. आत्तापर्यंत 23.2 ओवरचा खेळ संपला आहे. वेस्टइंडीजच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर पहिल्या सेशनमध्ये कोणत्याही खेळाडूने 30 चा आकडा पार केलेला नाही. जॉन चप्पबेल याने आठ धावा करून जसप्रीत बुमराहने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. तर चंद्रपाल याला एकही धाव करू दिली नाही आणि मोहम्मद सीराजचे विकेट घेतला.
ॲलेक अथनझे याने संघासाठी 12 धावा केल्या त्या ब्रँडोन किंग याने तेरा धावा करून मोहम्मद सिराजने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. शाई होप याने संघासाठी २६ धावा केल्या. भारताचे संघाने या पहिल्या सामनात कमालीची सुरुवात केली आहे. पुढील दोन सेशनवर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिला सेशनमध्ये पाच विकेट्स घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे.