IND vs WI: Who missed the double century? Is Shubman Gill responsible for the run-out? Yashasvi Jaiswal spoke clearly
Yashaswat Jaiswal spoke about the runout : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटीचा दूसरा दिवसाचा खेळ संपला असून वेस्ट इंडिजने ४ विकेट्स गमावून १४० धावा केल्या असून भारताने ३८७ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालचे द्विशतक हुकले, त्याचे कारण तो १७५ धावांवर असताना धावबाद झाला. शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील कॉल चुकला आणि यशस्वी १७५ धावांवर बाद झाला. त्याच्या धावबाद होण्याला कोण जबाबदार? अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर आता यशस्वी जयस्वालने मौन सोडले आहे.
दुसऱ्या दिवसाची सुरवात झाली तेव्हा शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल मैदानावर होते. या दिवसाच्या आठव्या चेंडूवर जयस्वाल जलद एक धाव घेण्याचा प्रयत्न करत धावबाद झाला. जयस्वालने पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत फक्त दोन धावांची भर घातली. जेडेन सील्सच्या पूर्ण लांबीच्या चेंडूवर जयस्वालने मिड-ऑफच्या दिशेने खेळण्यासाठी आपले पाय वापरुन चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. नॉन-स्ट्राइक एंडवर उभ्या असलेल्या कर्णधार गिलने धाव घेण्यास नकार दिला आणि जयस्वाल आधीच धावला होता आणि तिथेच त्याचा गेम झाला. शुभमन गिलने त्या एका धावेमध्ये काही एक रस दाखवला नाही. जयस्वाल परत येईपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तो धाव बाद झाला. त्यानंतर नाराज होऊन जयस्वाल बराच वेळ मैदानावरच राहिला निघून जाताना तो गिलवर खूप रागावलेला दिसला.
हेही वाचा : IND vs WI 2nd Test! रवींद्र जडेजाच्या जाळ्यात वेस्ट इंडिज! भारत मजबूत स्थितीत, घेतली 387 धावांची आघाडी
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रन-आउटवर जयस्वालने मौन सोडले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सामन्यानंतरच्या मुलाखतीत प्रसारकाशी बोलताना जयस्वाल म्हणाला की, “मी नेहमीच शक्य तितका वेळ खेळण्याचा प्रयत्न करत असतो. जर मी खेळात असलो तर मी खेळ पुढे नेला पाहिजे आणि शक्य तितका वेळ खेळला पाहिजे.” धावबादबद्दल तो म्हणाला की, “हा एक खेळाचा भाग आहे, म्हणून ते ठीक आहे.”
तिसरे द्विशतक हुकल्याबद्दल बोलताना जयस्वाल म्हणाला की, “मी नेहमीच हा विचार करत असतो की मी काय साध्य करू शकतो, माझे ध्येय काय असू शकते आणि माझ्या संघाचे ध्येय काय असू शकते. मी केवळ खेळात राहण्याचा प्रयत्न करतो आणि खात्री करतो की जर मी खेळात असलो तर मी शक्य तितका वेळ खेळला हवं.”
हेही वाचा : IND vs WI : ऐकावे ते नवलच! 175 धावा करूनही, यशस्वी जयस्वालच्या झोळीत नकोसा विक्रम