यशस्वी जयस्वाल(फोटो-सोशल मीडिया)
Embarrassing record in the name of Yashasvi Jaiswal : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांकडून शानदार कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ५१८ धावांवर घोषित केला. तथापि, भारतीय डावात सर्वात जास्त चर्चेचा विषय असलेला फलंदाज यशस्वी जयस्वालने शानदार १७५ धावांची खेळी केली. मात्र, द्विशतकाच्या जवळ असताना तो धावबाद झाल्याने त्याच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे.
यशस्वी जयस्वालने पहिल्या दिवसापासून आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शॉट्स मारले आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने २५८ चेंडूंचा सामना करत १७५ धावा केल्या. त्याने २२ चौकार मारले. पण तो द्विशतकाकडे वाटचाल करत असतानाच एका चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला आणि त्याचा डाव १७५ धावांवर आटोपला. त्यामुळे त्याचे द्विशतकही हुकले.
यशस्वी जयस्वालच्या बाद होण्याचा संघाच्या धावसंख्येवर परिणाम झाला नाही, परंतु तो वैयक्तिकरित्या खूपच निराश झाल्याचे दिसला. जयस्वाल आधीच अनेक दिग्गज भारतीय फलंदाजांनी भरलेल्या यादीत सामील झाला. या यादीत राहुल द्रविड, विजय हजारे आणि संजय मांजरेकर सारखे महान खेळाडू आहेत – जे सर्व त्यांच्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद झाले आहेत.
१९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २१८ धावा काढल्यानंतर संजय मांजरेकर धावबाद झाला होता. २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध २१७ आणि २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८० धावा काढल्यानंतर राहुल द्रविड देखील धावबाद झाला होता. आता, यशस्वी जयस्वाल देखील या विक्रमामध्ये सामील झाला आहे.
हेही वाचा : IND vs WI : शुभमन गिलचा धमाका सुरूच! वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकवून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम केला उद्ध्वस्त
यशस्वी जयस्वालची खेळीने टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचवले. यशस्वीने सिद्ध केले की तो मोठ्या सामन्यांमध्ये देखील दबाव हाताळू शकतो. एका धावबाद झाल्यामुळे त्याचे द्विशतकाचे स्वप्न जरी भंगले असले तरी, या खेळीमुळे तो भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील सर्वात आशादायक नावांपैकी एक म्हणून पुढे आला आहे.