फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय सामना : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघ संध्या एकदिवसीय मालिका कालपासून सुरु झाली आहे. याआधी या दोन्ही संघामध्ये T२० मालिका झाली. यामध्ये भारताच्या संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली. आता काल एकदिवसीय मालिकेचा महिला सामना झाला. एकदिवसीय मालिकेची सुरुवातही विजयाने केली. पहिला सामना वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने एका हाताने आश्चर्यकारक झेल घेतला. प्रत्येक वेळी तुम्ही हा झेल पाहाल तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद मिळेल.या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजच्या महिला संघाला १०३ धावांवर रोखलं आणि सामना नावावर केला.
U19 Asia Cup Final : भारतीय महिला युवा संघाने बांग्लादेशला पराभूत करून आशिया कप केला नावावर!
भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत ३१५ धावा ठोकल्या होत्या. वेस्ट इंडिजचा संघ ३१५ धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत होता. ११ धावांवर संघाच्या चार विकेट पडल्या होत्या. भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिने कमालीची खेळी खेळली. स्मृतीने संघासाठी १०२ चेंडूंमध्ये ९२ धावा केल्या तिचे आठ धावांसाठी शतक हुकले. त्यानंतर हरलीन देओलने संघासाठी ४० धावांची महत्वाची खेळी खेळली. तर प्रतीक्षा रावल ने सुद्धा ६९ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. यावेळी आता सोशल मीडियावर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने घेतलेल्या कॅचचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामुळे तिचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केले जात आहे.
आलिया ॲलेने आणि शमीन कॅम्पबेल क्रीजवर होते. दोघेही धावा काढू पाहत होते अशा स्थितीत आलियाला रेणुका सिंह ठाकूरचा चेंडू लाँग ऑनवर खेळायचा होता, कारण कर्णधार हरमनप्रीत कौर २५ यार्डच्या परिघात उभी होती. हरमनला चकमा देणे हे आलिया अलीनला करायचे होते आणि तिला सहज सीमारेषा मिळाली असती, पण हरनप्रीत कौरने हे होऊ दिले नाही. हरमनप्रीत कौरने जेव्हा बॉल आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिले तेव्हा ती थोडी मागे गेली आणि योग्य वेळी हवेत उडी मारली आणि उजव्या हाताने झेल पकडला. चेंडू कसातरी हरमनच्या हाताला अडकला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजचा निम्मा संघ २६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. हा चेंडू तिच्या हातात कसा आला याचं स्वतः कर्णधार हरमनला आश्चर्य वाटलं, कारण आलिया ॲलेने खूप वेगवान शॉट खेळला होता.
𝗣𝗹𝗮𝘆 𝗜𝘁 𝗢𝗻 𝗟𝗼𝗼𝗽!
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝘾𝘼𝙏𝘾𝙃! 😯
Absolute screamer! 👌 👌
Harmanpreet Kaur – Take A Bow 🙌 🙌
Live ▶️ https://t.co/OtQoFnoAZu#TeamIndia | #INDvWI | @ImHarmanpreet | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Fkuyj75Ok0
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
या मालिकेचा दुसरा सामना २४ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे त्यामुळे भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.