
RCB VS MI, WPL 2026: Royal Challengers Bangalore won the toss and elected to bat! The Mumbai girls will be bowling.
RCB VS MI, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. आज या हंगामातील पहिला सामना 9 जानेवारी रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि 2024 चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हरमनप्रीत कौरची मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
हेही वाचा : धक्कादायक! रणजी क्रिकेटपटूचे सामन्यादरम्यान मैदानात कोसळून निधन! BCCI कडून शोक व्यक्त
नाणेफेक गमावल्यावर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “नंतर पडणाऱ्या दवबिंदूंचा विचार करता, आम्ही देखील प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करतच होतो. पण हा हंगामातील पहिला सामना असल्यामुळे पुढे काय होते ते पाहूया. आतापर्यंत सर्व काही खूप चांगले राहिले आहे. आम्ही गेल्या १० दिवसांपासून सराव करत असून प्रत्येकजण चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आमच्याकडे एक संतुलित संघ आहे, जो गेल्या तीन हंगामांतील संघासारखाच आहे, त्यामुळे आम्ही आत्मविश्वासाने सामन्याला सामोरे जात आहोत.
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने या सामन्यात टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर तिने म्हटले आहे की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. या मैदानावर, विशेषतः दुसऱ्या सत्रात, दवबिंदू महत्त्वाची भूमिका बजावतात आणि हे असे मैदान आहे जिथे परिस्थिती लवकर बदलू शकते. आम्हाला सुरुवातीला अचूक गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला थांबवायचे आहे. मुली एकमेकींमध्ये खूप चांगल्या मिसळून गेल्या आहेत. हा एक तरुण संघ आहे, परदेशी खेळाडू चांगल्या प्रकारे रुळल्या आहेत आणि वातावरण खूप आनंददायी आहे. प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आम्ही सहा भारतीय खेळाडूंसह खेळणार असून आमच्या चार परदेशी खेळाडू ग्रेस हॅरिस, नादिन डी क्लर्क, लॉरेन बेल आणि लिन्से स्मिथ आहेत.
हेही वाचा : WPL 2026: पहिल्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा झटका! ‘ही’ स्टार अष्टपैलू खेळाडू सुरुवातीच्या सामन्याला मुकणार…
मुंबई इंडियन्स महिला : नॅट सायव्हर-ब्रंट, जी कमलिनी (डब्ल्यू), अमेलिया केर, हरमनप्रीत कौर (क), अमनजोत कौर, निकोला केरी, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजीवन सजना, सायका इशाक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला : स्मृती मानधना (क), ग्रेस हॅरिस, दयालन हेमलता, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लर्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, प्रेमा रावत, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल