फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश U19 आशिया कप फायनल : आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये U19 महिला संघाचा आशिया कपचा फायनलचा सामना रंगला होता. १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने अंतिम पराभवाचा बदला व्याजासह घेतला. बांग्लादेशविरुद्धच्या महिला अंडर-19 आशिया चषकाच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताने घातक गोलंदाजीच्या जोरावर शानदार विजय नोंदवत ट्रॉफीवर कब्जा केला. प्रथम फलंदाजी करताना त्रिशाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ७ गडी गमावून ११७ धावा केल्या. लक्ष्य छोटे होते पण किलर गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ अवघ्या ७६धावांत गडगडला.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆
India Women U19 are the inaugural winners of the #ACCWomensU19AsiaCup 👏
Scoreboard ▶️ https://t.co/uREtAlBiiq#TeamIndia | #ACC | #Final pic.twitter.com/D1R6z6nENY
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये बांग्लादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताच्या महिला संघानी फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांग्लादेशचा पराभव केला. टीम इंडियासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून गोगाडी त्रिशा आणि कमालिनी या दोघी आल्या होत्या. भारताच्या संघाने पहिले दोन विकेट लवकर गमावला त्यानंतर गोगाडी त्रिशाने भारताच्या संघासाठी ५२ धावांची खेळी खेळली.
सतत पडणाऱ्या अडथळ्यांमध्ये त्रिशा एकटीने एक टोक पकडण्यात यशस्वी ठरले. या अर्धशतकामध्ये तिने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याने ४७ चेंडूत ५२ धावा करत संघाला संकटातून बाहेर काढले. या खेळीमुळे भारताला बांगलादेशविरुद्ध २० षटकांत ११७ धावा करता आल्या. मिथिला विनोदने १७ तर कर्णधार निक्की प्रसादने १२ धावा केल्या.
For leading from the front and playing a vital innings of 52(47), Gongadi Trisha is awarded the Player of the Match 🏆
She is also the Player of the Series 👏
Scoreboard ▶️ https://t.co/uREtAlBiiq#TeamIndia | #ACC | #ACCWomensU19AsiaCup | #Final pic.twitter.com/zTVucqiPMF
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
भारताने बांगलादेशसमोर ११८ धावांचे लक्ष्य ठेवले तेव्हा चाहत्यांना आणखी एका ट्रॉफीची आशा होती. अलीकडेच, पुरुष संघाने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून अंडर १९ आशिया चषक विजेतेपद पटकावले. भारतीय महिलांनी येथे बाजी मारली आणि पुरुष संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. आयुषी शुक्लाने तीन, पारुनिका सिसोदिया आणि सोनम यादवने प्रत्येकी २ बळी घेत भारताला सामना जिंकून दिला. बांगलादेशचा संपूर्ण संघ १८.३ षटकात अवघ्या ७६ धावांवर गडगडला आणि भारताने हा सामना ४१ धावांनी जिंकून ट्रॉफीवर कब्जा केला.
भारताचा महिला संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत आहे. यंदा झालेल्या विश्वचषकामध्ये भारताच्या महिला संघाच्या हाती निराशा लागली. त्यानंतर आता नुकतीच टीम इंडियाची T२० मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध झाली यामध्ये भारताच्या संघाने या मालिकेवर २-१ असा विजय मिळवला.