Ind vs WI: India sweeps West Indies clean! Gill Army equals world record with clean sweep
India’s record in Test cricket : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली गेली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला. भारताने या विजयसह वेस्ट इंडिजविरुद्ध २-० अशी मलिका जिंकली. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-० अशी जिंकून भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील जागतिक विक्रमाची बरोबरी साधली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध १० व्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली आहे. यासह, भारत कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.
हेही वाचा : IND vs WI : ‘तो सर्व निकष पूर्ण…’, शुभमन गिलच्या नेतृत्वावर प्रशिक्षक गौतम गंभीरचे विधान चर्चेत
भारतापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने १९९८ ते २०२४ दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १० कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने २००० ते २०२२ दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध सलग ९ कसोटी मालिका खिशात टाकल्या आहेत. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियन संघाने १९८९ ते २००३ दरम्यान इंग्लंडविरुद्ध सलग आठ कसोटी मालिका जिंकल्या होत्या, तर श्रीलंकेने १९९६ ते २०२० दरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध आठ कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे.
वेस्ट इंडिज संघाने भारताच्या भूमीवर भारतीय संघाविरुद्ध सलग सहा कसोटी सामने गमावले आहेत. भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाची ही मालिका डॅरेन सॅमीकडे संघाचे नेतृत्व असताना सुरू झाली. डॅरेन सॅमी सध्या वेस्ट इंडिज संघाचा प्रशिक्षक आहेत.
हेही वाचा : AUS vs IND : किंग कोहली मायदेशी परतला! विमानतळावर विराटची झलक पाहण्यासाठी उडाली झुंबड; पहा Video
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून ५१८ धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर संपला. भारताला पहिल्या डावाच्या आधारे २७० धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध फॉलोऑन लावला. फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने ३९० धावा करून भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य उभे केले. जे भारताने केवळ तीन विकेट गमावून पूर्ण केले आणि सामन्यासह भारताने मलिका जिंकली. भारतासमोर विजयासाठी असलेले १२१ धावांचे लक्ष्य ३५.२ षटकांत सात विकेट्स शिल्लक असताना गाठले. सलामीवीर केएल राहुलने या डावात नाबाद ५८ धावा केल्या आहेत.