विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli returns home : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या समाप्तीनंतर मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मोठ्या कालावधीनंतर भारतात परतला आहे. तो आता पुन्हा संघात सामील झाला आहे. स्पर्धेनंतर कोहलीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि इंग्लंडमध्ये कुटुंबासोबत दिवस घालवले. आता, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्या पुनरागमनाने भारतीय चाहते खूपच आनंदी असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : Ind vs WI : ध्रुव जुरेलने गाठला मैलाचा दगड! भारतासाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
भारतात आगमन होताच, विराट कोहलीचा विमानतळ लूक सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. तो काळ्या शर्ट आणि पांढऱ्या ट्राउझर्समध्ये दिसून आला. त्याचा आत्मविश्वास देखील स्पष्ट दिसत होता. चाहत्यांनी त्याला विमानतळावर पाहून उत्साहाने प्रतिसाद देखील दिला आणि अनेकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्याचा देखील प्रयत्न केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियार्मवर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोन टप्प्यात रवाना होणार आहे. पहिल्या तुकडीत असे खेळाडू समाविष्ट आहेत जे नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज कसोटी मालिकेमध्ये सहभागी नव्हते. या गटात विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि इतर अनेक खेळाडू असणार आहेत.
तसेच दुसऱ्या टप्प्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळलेले आणि एकदिवसीय संघात असलेले खेळाडू समाविष्ट असणार आहेत. यामध्ये शुभमन गिल, ध्रुव जुरेल, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असणार आहे. बीसीसीआयच्या मते, खेळाडूंना पुरेशी विश्रांती आणि तयारीचा वेळ मिळावा यासाठी संघाचा प्रवास आराखडा तयार केला गेला आहे.
VIRAT KOHLI HAS ARRIVED IN DELHI. – The GOAT is back. 🔥 [Sports Yaari] pic.twitter.com/7WrMofkMno — Johns. (@CricCrazyJohns) October 14, 2025
विराट कोहलीने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.परंतु त्याचे लक्ष आता पूर्णपणे एकदिवसीय क्रिकेटवर असणार आहे. त्याचे ध्येय आता आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करणे आणि २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी आगाऊ तयारी करणे असणार आहे.
हेही वाचा : IND vs WI : ‘तो सर्व निकष पूर्ण…’, शुभमन गिलच्या नेतृत्वावर प्रशिक्षक गौतम गंभीरचे विधान चर्चेत
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित सिंह, कृष्णा ऋषि, कृष्णा, कृष्णा, कृष्णा राणा.